'डीडीएलजे' कास्ट... तेव्हा आणि आत्ता!

Dec 04, 2014, 22:51 PM IST
1/11

सतीश शाह
अमरीश पुरी यांच्या मित्राच्या भूमिकेत सतीश शहा दिसले होते. आजही ते अनेक सिनेमांत भूमिका साकारताना दिसतात.

2/11

परमीत सेठी
सतीश शहा यांचा मुलगा आणि काजोलचा होणाऱ्या पतीची भूमिका परमीतनं निभावली होती. ‘डीडीएलजे’मधला हा पंजाबी मुंडा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

3/11

अर्जुन सबलोक
अर्जुननंही शाहरुखच्या मित्राची भूमिका निभावली होती. ‘निल अँन्ड निक्की’ या सिनेमाचं दिग्दर्शन अर्जुननं केलं होतं. 

4/11

करण जोहर
‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मध्ये राजच्या एका बावळट मित्राच्या भूमिकेत दिसलेला करण सध्या बॉलिवूडचा एक आघाडीचा सिनेनिर्माता ठरलाय. 

5/11

फरीदा जलाल
सिमरनच्या आईच्या भूमिकेत दिसलेल्य ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल सध्या छोट्या पडद्यावरच्या काही डेली सोप्समध्ये काम करताना दिसत आहेत. 

6/11

अनाइता श्रॉफ अदजानिया
‘डीडीएलजे’मध्ये अनाइता सिमरनच्या मैत्रिणीची भूमिकेत दिसली होती. सध्या, बॉलिवूडची आघाडीची स्टायलिस्ट आणि कास्चुम डिझायनर म्हणून काम करतेय. दिग्दर्शक होमी अदजानिया याच्यासोबत ती विवाहबद्ध झालीय. 

7/11

मंदिरा बेदी
राजवर मनापासून प्रेम करणारी आणि आपल्या डोळ्यांनीच खूप काही बोलणाऱ्या एका पंजाबी तरुणीची भूमिका मंदिरानं केली होती. ‘डीडीएलजे’मध्ये सतीश शाह यांच्या मुलीची – प्रिती सिंग हिची भूमिका मंदिरानं निभावली होती. मंदिरा सध्या एक प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटेटर तर आहेच शिवाय तिनं स्वत:चा साड्यांचा एक ब्रँडही लॉन्च केलाय. 

8/11

पुजा रुपारेल
सिमरनच्या छोट्या बहिणीच्या - ‘छुटकी’च्या भूमिकेत दिसलेली चुलबुली पुजा रुपारेल... आत्ता मात्र बॉलिवूडमधून गायब आहे. ‘किंग अंकल’ या सिनेमात ती शेवटचं काम करताना दिसली.  

9/11

शाहरुख खान 
‘राज मल्होत्रा’च्या भूमिकेत दिसलेला शाहरुख आजही ‘लाखों दिलों की धडकन’ म्हणून ओळखला जातोय. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’नंतरचा त्याचा प्रवास बहरतच जाताना दिसतोय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे ‘हॅपी न्यू इअर’... यामध्ये तो त्याच्या वयाच्या निम्या वयाच्या दीपिका पादूकोणसोबत रोमान्स करताना दिसतोय.

10/11

काजोल 
‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मध्ये दिसलेली काळी-सावळी काजोल आणि आजची काजोल पाहिली तर तुम्हाला तिच्यात झालेला फरक लगेचच दिसून येईल. ‘सिमरन’च्या भूमिकेत दिसलेल्या काजोलनं प्रत्येक सीनमधून प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलं. सध्या काजोल बॉलिवूडच्या सिनेमांत दिसत नसली तरी ती अनेक प्रकारच्या कार्यक्रमांत आवर्जुन भाग घेताना दिसते. 

11/11

‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ हा सिनेमा लवकरच एक रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे. तब्बल 1000 आठवडे दाखवला गेलेला हा मोठ्या पडद्यावरचा पहिलाच सिनेमा ठरणार आहे. मराठा मंदिर या सिनेमा गृहात गेली 20 वर्ष झळकतोय... याच सिनेमाच्या या अनोख्या रेकॉर्डनिमित्तानं जाणून घेऊयात... या सिनेमाच्या तेव्हाच्या कास्टबद्दल...  