भारतीय क्रिकेट टीमचे २०१७चे संपूर्ण वेळापत्रक

Feb 18, 2017, 09:18 AM IST
India vs England, Limited-Over Series
1/9

२०१७ची सुरुवात भारताची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने होतेय. जानेवारी महिन्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. वनडे मालिका १५ ते २२ जानेवारी आणि टी-२० मालिका २६ ते १ फेब्रुवारीपर्यंत असेल.   

India vs Bangladesh One-Off Test
2/9

या महिन्यात ८ फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना भारत खेळणार आहे.   

Australia`s tour of India, Border-Gavaskar trophy
3/9

या महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होतेय. २३ फेब्रुवारीला पहिल्या कसोटीला सुरुवात होतेय. पहिली कसोटी पुण्यात रंगणार आहे तर अखेरची कसोटी २५ते २९ मार्चदरम्यान होणार आहे.   

Indian Premier League 2017
4/9

यादरम्यानच एप्रिल ५ ते २१ मे या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग रंगणार आहे.   

ICC Champions Trophy 2017 (June)
5/9

जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचे साखळी फेरीतील सामने पहिल सामना ४जून  - भारत वि पाकिस्तान दुसरा सामना ८ जून - भारत वि श्रीलंका तिसरा सामना ११ जून - भारत वि दक्षिण आफ्रिका    

India`s tour of West Indies (July)
6/9

जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहेत. यात ५ वनडे आणि १ टी-२० सामना खेळवला जाणार आहे. ठिकाण आणि ताऱखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.   

India`s tour of Sri Lanka
7/9

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यात ते ३ कसोटी, ५ वनडे आणि १टी-२० सामना खेळतील. दरम्यान या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण जाहीर झालेले नाहीत.   

Australia`s tour of India
8/9

या महिन्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ५ वनडे आणि १ टी-२० सामना खेळतील. दरम्यान या दौऱ्यातील सामन्यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.   

India`s tour of South Africa (November 2017-January 2018)
9/9

२०१७च्या अखेरीस भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यात ४ कसोटी,, ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील.