'ती'च्या कणखर व्यक्तीमत्त्वाची ओळख!

Aug 17, 2017, 05:00 PM IST
1/11

तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष... तुमच्या आजुबाजुला, घरात, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा इतर सामाजिक क्षेत्रात तुम्ही अशा स्त्रियांना भेटला असाल जिच्या व्यक्तीमत्त्वानंच तुम्हाला प्रभावित करून टाकलं असेल... केवळ सौंदर्य नाही तर तिच्या बुद्धिमत्तेनंही तुम्हाला आकर्षित केलं असेल...  पण, नेमकं का ठरतं हे व्यक्तीमत्त्व इतकं प्रभावी? कसं उभं राहतं एखादं कणखर व्यक्तीमत्त्व? 'ती'च्या कणखर व्यक्तीमत्वाची ही ओळख... 

2/11

'ती'ची स्वत:शीच स्पर्धा... ती एक सक्षम व्यक्ती असते... स्वत:चे निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात असते. ती स्वत:चीच टीकाकारही असते. तीची काळजी घेण्यासाठी किंवा अवलंबून राहण्यासाठी तिला एखाद्या पुरुषाची आवश्यकता नसते. स्वावलंबी स्त्री आपल्या आयुष्यातील स्वत:च्या निर्णयांची जबाबदारीही स्वीकारते.   

3/11

नात्यातली समानता कणखर स्त्री एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडली असेल तरी आपल्या नात्यात तिला समानता अपेक्षित असते. तुम्ही तिला प्रेम दिलंत तर तिच्याकडूनही तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल... पण, ते मिळालं नाही तर तीच्या नात्याकडून फारशा अपेक्षाही ठेवत नाही. 

4/11

इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा तिला आयुष्यात काय हवंय, हे माहीत असतं... काय हवंय हे माहीत नसलं तरी काय नकोय हे तिला चांगलंच ठाऊक असतं. स्वत:च्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ती इतरांवर ढकलत नाही. तीचं व्यक्तीमत्त्वचं आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेलं असतं.

5/11

स्वत:शी प्रामाणिकपणा...  तिच्याकडे पाहून कदाचित तिला भावनांच्या बाबतीत ती अतिशय थंड आहे किंवा तिला भावनाच नाहीत, असा गैरसमज तुमचा होऊ शकेल... पण भावनेत वाहून जाण्यापेक्षा प्रॅक्टिकल विचारांवर आणि निर्णयावर तिचा अधिक विश्वास असेल. भावनांवर ताबा ठेऊनच तुम्ही आयुष्यात पुढे वाटचाल करू शकता, हे तिला पक्कं माहीत असतं. त्यामुळेच पडत्या काळात किंवा विरुद्ध परिस्थितीतही ती स्थिर राहू शकते. ती स्वत: इतरांशी प्रामाणिक असते... आणि तोच प्रामाणिकपणा तिला इतरांकडून अपेक्षित असतो. 

6/11

सकारात्मकता ती वरचेवर अलिप्त वाटत असली तरी तिला नात्यांचं ओझं नसतं. तिच्याकडून तुम्हाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळत असते. खऱ्या आणि खोट्या नात्यांचंही तिला दडपण येत नाही. खरं नातं ती प्रामाणिकपणे सांभाळते पण खोट्या नात्यांनी ती हुरळून किंवा कोलमडून जात नाही.  

7/11

खोटेपणा ओळखणारी... तुम्ही तिच्याशी खोटं बोललात तर समजून घ्या की तुमचं काही खरं नाही... तिनं प्रतिक्रियेतून ते व्यक्त केलं नाही तरी तिला तुम्ही खोटं बोलताय हे कदाचित समजलेलं असेल. तुम्ही तिच्याशी प्रामाणिक राहू शकत नसाल तर ती तुम्हाला तिच्या आयुष्यातून सहजच बाजुला करू शकते. 

8/11

आदर आणि सुसंगतता स्वत:चं मूल्य तिला चांगलंच ठाऊक असतं... त्यामुळे तिच्यासमोर तुम्हाला तुमच्या शब्दांना आणि कृतींना सारखंच ठेवावं लागेल... नात्यात आणि संबंधात आदर आणि सुसंगतता राखावी लागेल... त्यासाठी प्रयत्न करावे लागतील... आणि त्यासाठी कदाचित तिच्याकडूनही तु्म्हाला अगदी सहजच मदत मिळेल. प्रेमाची आणि आदराची भावना तुमच्याकडून तिला मिळाली तर आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेलं प्रेम तुम्हाला तिच्याकडून मिळेल.

9/11

टाळता न येणारं व्यक्तीमत्त्व अशा व्यक्तीमत्त्वांना हाताळणं हे सगळ्यांनाच जमेल असं नाही... आपले विचार समोर मांडण्यासाठी ती संकोच करणार नाही. त्यामुळे तुम्ही तिच्या मतांशी सहमत असाल किंवा नसाल पण, तुम्हाला त्यांना टाळता येणार नाही. 

10/11

निरपेक्ष प्रेम तिचं व्यक्तीमत्त्वचं आशादायी ठरतं... अशी व्यक्ती जिच्यावर प्रेम करते त्यांनाच केवळ तिच्या प्रेमाची तीव्रता जाणवू शकेल. अशा प्रकारचं निरपेक्ष प्रेम निव्वळ दुर्मिळ असतं... पण ज्यांना हे प्रेम मिळतं त्याची किंमत त्यांनाच कळते. तिच्या जगण्यातील मूल्यांचा, तिच्या विचारांचा, तिच्या जाणीवेचा तुम्हाला आदरच वाटेल. 

11/11

आव्हानात्मक पण स्फूर्तीदायक अशा प्रकारचं व्यक्तीमत्त्व कदाचित तुमच्याही आयुष्याला दिशा देऊ शकतं. तुम्ही जसे आहात तसं ती तुम्हाला स्वीकारते... तुमच्यातील गुण ती ओळखून त्या गुणांची जाणीव तुम्हालाच करून देऊ शकते. अशी स्त्रीसोबत अनेक पुरुषांना आव्हानात्मक वाटू शकते... पण, तिच्यामुळेच तुम्हाला स्फूर्ती, नवी उमेद मिळू शकते.