बलात्कार आणि 'कुजलेली' भारतीय पुरुषी मानसिकता

Mar 07, 2015, 12:24 PM IST
1/23

शिला दीक्षित, नेत्या, काँग्रेस
तुम्ही मुली आहात... आणि म्हणूनच तुम्ही धाडसी (अॅडव्हाचरस) असता कामा नये. 

शिला दीक्षित, नेत्या, काँग्रेस
तुम्ही मुली आहात... आणि म्हणूनच तुम्ही धाडसी (अॅडव्हाचरस) असता कामा नये.   

2/23

सत्यदेव दुबे, नेता, काँग्रेस
स्त्रिया पुरुषांकडे सूचक डोळ्यांनी पाहतात, आणि त्यामुळेच पुरुष बलात्कार करतात

सत्यदेव दुबे, नेता, काँग्रेस
स्त्रिया पुरुषांकडे सूचक डोळ्यांनी पाहतात, आणि त्यामुळेच पुरुष बलात्कार करतात

3/23

रामजपाल सिंग सैनी, बहूजन समाज पार्टी
लहान मुलांना, खासकरून मुलींच्या हातात मोबाईल देऊ नका. जर एखाद्या मुलाच्या हातात मोबाईल दिलाच असेल तर तो परत घ्या. मुलींजवळ मोबाईल नसेल तर असा काय मोठा फरक पडणार आहे.   

4/23

मुलायम सिंग यादव, नेते, समाजवादी पार्टी
बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देणं चूक आहे. पुरुष चुका करतात. 

जेव्हा, एखाद्या मुलीचं तिच्या मित्रासोबत किंवा प्रियकरासोबत भांडण होतं तेव्हा ती बलात्काराची तक्रार नोंदवते. 

मुलायम सिंग यादव, नेते, समाजवादी पार्टी
बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देणं चूक आहे. पुरुष चुका करतात.  जेव्हा, एखाद्या मुलीचं तिच्या मित्रासोबत किंवा प्रियकरासोबत भांडण होतं तेव्हा ती बलात्काराची तक्रार नोंदवते. 

5/23

ममता बॅनर्जी, अध्यक्ष, तृणमूल काँग्रेस 
अगोदर, एखादी स्त्री-पुरुष हातात घात घालून फिरताना दिसले तर त्यांच्या पालकांकडून आणि इतरांकडू त्यांना पकडलं जात होतं. पण आता सगळंच खुलं झालंय. हे एखाद्या ओपन मार्केटप्रमाणे झालंय. 
स्त्रिया आणि पुरुषांना एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात, त्यामुळेच बलात्कार होतात. 

6/23

मनोहर लाल खट्टर, हरियाणाचे मुख्यमंत्री
जर एखाद्या मुलीनं अंगभर कपडे परिधान केले असतील तर एखादा मुलगा तिच्याकडे चुकीच्या नजरेनं पाहणार नाही. स्वातंत्र्यच हवं असेल तर त्या रस्त्यावर नग्न का फिरत नाहीत? स्वातंत्र्य मर्यादीतच असायला हवं. हे तोकडे कपडे बिपडे हे सगळं पश्चिमी अनुकरण आहे. आपल्या संस्कृतीत मुलींना पूर्ण कपडे परिधान करावेत, असंच म्हटलंय.

7/23

मुरली मनोहर जोशी, भाजप
माझा असा विश्वास आहे की, सामान्यांच्या जीवनात जर योगाला स्थान दिलं तर दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणं बंद होतील, असं मी म्हणणार नाही पण, ते प्रमाण नक्की कमी होईल

मुरली मनोहर जोशी, भाजप
माझा असा विश्वास आहे की, सामान्यांच्या जीवनात जर योगाला स्थान दिलं तर दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणं बंद होतील, असं मी म्हणणार नाही पण, ते प्रमाण नक्की कमी होईल

8/23

बोत्सा सत्यनारायण, भाजप
केवळ भारताला रात्री स्वातंत्र्य मिळालंय याचा अर्थ असा नव्हे की स्त्रियांनी रात्री उघडपणे रस्त्यांवर फिरावं... 

बोत्सा सत्यनारायण, भाजप
केवळ भारताला रात्री स्वातंत्र्य मिळालंय याचा अर्थ असा नव्हे की स्त्रियांनी रात्री उघडपणे रस्त्यांवर फिरावं... 

9/23

आशा मिरगे, नेत्या, राष्ट्रवादी
आपण काय घातलंय, याबाबत मुलींना जागरूक राहवं. सोबतच, आपण कोणत्यावेळी शहरात फिरतोय, याचंही भान त्यांना असायला हवं. 

त्यांच्या शरीरानं बलात्काऱ्यांचं लक्ष आपल्या जाऊन त्यांना उद्युक्त करता कामा नये. 

आशा मिरगे, नेत्या, राष्ट्रवादी
आपण काय घातलंय, याबाबत मुलींना जागरूक राहवं. सोबतच, आपण कोणत्यावेळी शहरात फिरतोय, याचंही भान त्यांना असायला हवं.  त्यांच्या शरीरानं बलात्काऱ्यांचं लक्ष आपल्या जाऊन त्यांना उद्युक्त करता कामा नये. 

10/23

मोहन भागवत, सरसंघचालक, आरएसएस 
'इंडिया'तल्या शहरात वाढत चाललेली बलात्कार प्रकरणं हा एक गंभीर आणि लाजिरवाणी विषय आहे. हा एक धोकादायक ट्रेन्ड सुरू आहे. 

पण, असा प्रकार आमच्या 'भारता'त किंवा खेड्यांत होत नाहीत. तुम्ही खेड्यांत जाऊन पाहा, तिथं सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळाची प्रकरणंच घडत नाहीत. 

जेव्हापासून, पश्चिमी संस्कृतीच्या पगड्यामुळे भारत 'इंडिया' बनलाय तेव्हापासून अशी प्रकरणं सुरू झालीत. 

मोहन भागवत, सरसंघचालक, आरएसएस 
'इंडिया'तल्या शहरात वाढत चाललेली बलात्कार प्रकरणं हा एक गंभीर आणि लाजिरवाणी विषय आहे. हा एक धोकादायक ट्रेन्ड सुरू आहे.  पण, असा प्रकार आमच्या 'भारता'त किंवा खेड्यांत होत नाहीत. तुम्ही खेड्यांत जाऊन पाहा, तिथं सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळाची प्रकरणंच घडत नाहीत.  जेव्हापासून, पश्चिमी संस्कृतीच्या पगड्यामुळे भारत 'इंडिया' बनलाय तेव्हापासून अशी प्रकरणं सुरू झालीत. 

11/23

साक्षी महाराज, भाजप नेता
ते मुलींचं मुलींशी आणि मुलांचं मुलांशी लग्न लावण्याची शिफारस करतात... आणि हीच कामं मागच्या सरकारानं केलीत. 

त्यामुळेच, मी स्त्रियांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यावा. 

साक्षी महाराज, भाजप नेता
ते मुलींचं मुलींशी आणि मुलांचं मुलांशी लग्न लावण्याची शिफारस करतात... आणि हीच कामं मागच्या सरकारानं केलीत.  त्यामुळेच, मी स्त्रियांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यावा. 

12/23

जितेंद्र छत्तर, खाप पंचायत नेता
फास्ट फूड आणि तत्सम पदार्थांच्या सेवन... हे वाढत्या बलात्कारांचं मूळ कारण आहे. चायनीज पदार्थांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात... आणि ते मुलांना बलात्कारासाठी उदयुक्त करतात.

13/23

ओम प्रकाश चौटाला, नेता, लोकदल 
बलात्कार आणि स्त्रियांविरुद्धचे इतर अत्याचार थांबवायचे असतील तर त्यावर 'बालविवाह' हा एकच उपाय असू शकतो. मुघल काळापासून, आपल्या मुलींना अत्याचारापासून वाचविण्यासाठी लहाणपणीच त्यांची लग्न लावून दिली जात होती. 

14/23

रणजीत सिन्हा, माजी सीबीआय संचालक
स्त्रिया जर बलात्कार थांबवू शकत नसतील, तर त्या एन्जॉय करतात. 

रणजीत सिन्हा, माजी सीबीआय संचालक
स्त्रिया जर बलात्कार थांबवू शकत नसतील, तर त्या एन्जॉय करतात. 

15/23

अबू आझमी
इस्लाममध्ये बलात्काराला फाशीची शिक्षा सांगितली गेलीय. पण, अशा प्रकरणात स्त्रियांना मात्र कुठलीही शिक्षा मिळत नाही. स्त्रियाही या प्रकरणात दोषी असतात. 

यावर उपाय म्हणजे, एखादी स्त्री, भले ती विवाहीत असो किंवा नसो, एखाद्या पुरुषावर गेली... तिच्या संमतीशिवाय किंवा असंमतीशिवाय... तिलाही फासावर चढवायला हवं... दोघांनाही फासावर चढवायला हवं.  

अबू आझमी
इस्लाममध्ये बलात्काराला फाशीची शिक्षा सांगितली गेलीय. पण, अशा प्रकरणात स्त्रियांना मात्र कुठलीही शिक्षा मिळत नाही. स्त्रियाही या प्रकरणात दोषी असतात.  यावर उपाय म्हणजे, एखादी स्त्री, भले ती विवाहीत असो किंवा नसो, एखाद्या पुरुषावर गेली... तिच्या संमतीशिवाय किंवा असंमतीशिवाय... तिलाही फासावर चढवायला हवं... दोघांनाही फासावर चढवायला हवं.  

16/23

रामसेवक पायक्रा, भाजप नेता
बलात्कार कधीही ठरवून केले जात नाहीत... ते चुकभूलीनं होतात... 

रामसेवक पायक्रा, भाजप नेता
बलात्कार कधीही ठरवून केले जात नाहीत... ते चुकभूलीनं होतात... 

17/23

कैलाश विजयवारगिया, नेता, भाजप
स्त्रिया नैतिकतेच्या सीमा ओलांडतात, आणि त्यामुळेच बलात्काराची प्रकरणं घडतात

कैलाश विजयवारगिया, नेता, भाजप
स्त्रिया नैतिकतेच्या सीमा ओलांडतात, आणि त्यामुळेच बलात्काराची प्रकरणं घडतात

18/23

प्रभूपदा
असं नसतं की स्त्रियांना बलात्कार आवडत नाही. त्यांना तो कधीकधी आवडतोही... ते त्यांच्या मनाने संभोग करतात. ही  मानसिकता आहे. त्या थोडा फार नकार देतात पण, खरं म्हणजे त्यांना तो हवा असतो.

प्रभूपदा
असं नसतं की स्त्रियांना बलात्कार आवडत नाही. त्यांना तो कधीकधी आवडतोही... ते त्यांच्या मनाने संभोग करतात. ही  मानसिकता आहे. त्या थोडा फार नकार देतात पण, खरं म्हणजे त्यांना तो हवा असतो.

19/23

आसाराम बापू, स्वयंघोषित संत आणि सध्या बलात्कार प्रकरणात तुरुंगात
केवळ ५ किंवा ६ माणसं गुन्हेगार असू शकत नाहीत. बलात्कार प्रकरणातील मुलगी तिच्यावर बलात्कार करण्याऱ्याइतकीच दोषी असते. तीनं त्याला 'भाऊ' म्हणून हाक मारून आपल्याला सोडून देण्याची भीक मागायला हवी. मग, तिच्यावर बलात्कार झालाच नसता... आणि मग, तिचा जीवही वाचला असता आणि प्रतिष्ठाही 

20/23

एम. एल शर्मा, दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा वकील
आमच्या समाजात, आम्ही कधीही आमच्या मुलींनी रात्री ६.३०, ७.३० किंवा ८.३० वाजल्यानंतर घराबाहेर पडण्याची परवानगी देत नाही.

तुम्ही जर स्त्री आणि पुरुष मैत्रिबद्दल बोलाल तर सॉरी, त्याला आमच्या समाजात कसलंही स्थान नाही. आमची संस्कृती खूप श्रेष्ठ आहे... आमच्या संस्कृतीत स्त्रियांना स्थान नाही.

एम. एल शर्मा, दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा वकील
आमच्या समाजात, आम्ही कधीही आमच्या मुलींनी रात्री ६.३०, ७.३० किंवा ८.३० वाजल्यानंतर घराबाहेर पडण्याची परवानगी देत नाही. तुम्ही जर स्त्री आणि पुरुष मैत्रिबद्दल बोलाल तर सॉरी, त्याला आमच्या समाजात कसलंही स्थान नाही. आमची संस्कृती खूप श्रेष्ठ आहे... आमच्या संस्कृतीत स्त्रियांना स्थान नाही.

21/23

ए. पी. सिंग, दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा वकील
जर माझ्या मुलीनं किंवा बहिणीनं लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवले असते... अशा पद्धतीनं तोंड काळं केलं असतं, पावित्र्य नष्ट केलं असतं तर मी अशा वेळी बहिणीला किंवा मुलीला माझ्या फार्म हाऊसवर नेऊन संपूर्ण कुटुंबादेखत पेट्रोल टाकून पेटवून दिलं असतं. 

22/23

मुकेश सिंग ('निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषी)
तिचा बलात्कार होताना तिनं प्रतिकार करायला नको होतं.. तीनं केवळ गप्प राहायला हवं होतं. मग, त्यांनी फक्त तिच्यावर बलात्कार केला असता आणि बाहेर फेकून दिलं असतं... तिच्या मित्रालाच मारहाण केली असती.

टाळी काही एका हातानं वाजत नाही. एखादी सभ्य मुलगी रात्री ९ नंतर बाहेर फिरत नाही. त्यामुळे, बलात्कार करणाऱ्यापेक्षा ती मुलगीच जास्त दोषी आहे. मुली आणि मुलं कधीच समान नसतात. घर सांभाळणं आणि साफ-सफाई करणं एवढंच मुलींचं काम... त्यांनी रात्री तोकडे कपडे घालून डिस्को आणि बारमध्ये जाणं चुकीचं आहे. पण, केवळ २० टकके मुलीच चांगल्या असतात. 

मुकेश सिंग ('निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषी)
तिचा बलात्कार होताना तिनं प्रतिकार करायला नको होतं.. तीनं केवळ गप्प राहायला हवं होतं. मग, त्यांनी फक्त तिच्यावर बलात्कार केला असता आणि बाहेर फेकून दिलं असतं... तिच्या मित्रालाच मारहाण केली असती. टाळी काही एका हातानं वाजत नाही. एखादी सभ्य मुलगी रात्री ९ नंतर बाहेर फिरत नाही. त्यामुळे, बलात्कार करणाऱ्यापेक्षा ती मुलगीच जास्त दोषी आहे. मुली आणि मुलं कधीच समान नसतात. घर सांभाळणं आणि साफ-सफाई करणं एवढंच मुलींचं काम... त्यांनी रात्री तोकडे कपडे घालून डिस्को आणि बारमध्ये जाणं चुकीचं आहे. पण, केवळ २० टकके मुलीच चांगल्या असतात. 

23/23

'बीबीसी'ची 'इंडियाज डॉटर' ही डॉक्युमेंटरी सध्या भलतीच वादात आहे... या डॉक्युमेंटरीवर भारतीय सरकारनं बॅन जाहीर केल्यामुळे तर अनेक जण मिळवून मिळवून ती डॉक्युमेंटरी पाहत आहेत... कारण, ती सोशल वेबसाईटवर सहज पाहायला मिळतेय. 

खरं म्हणजे, डॉक्युमेंटरी आणि बीबीसीचा व्यवहारीपणा आपण थोड्या वेळ बाजुला ठेवला तर लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये भारतीय पुरुषांची मानसिकता किती खालच्या दर्जाची आहे. इतकंच काय तर, परंपरेनं आलेल्या आणि त्या आहेत तशाच स्वीकारलेल्या परंपरा आणि विचार यांमुळे काही स्त्रियांचीही मानसिकता यापेक्षा काही वेगळी नाही. 

बरं, ही मानसिकता केवळ समाजातील खालच्या पातळीवर आढळणाऱ्या लोकांचीच आहे का तर तसं नाही... समाजात उच्च शिक्षित आणि विद्याविभूषित म्हणून मिरवणाऱ्यांचीही तीच मानसिकता आपल्याला आजही दिसते. 

केवळ बीबीसीच्या व्हिडिओच्या निमित्ताने या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली एव्हढंच... या आधीही आपल्याला अनेकांनी अशीच वादग्रस्त वक्तव्य केलीतच की... आठवत नसतील तर चला... एक नजर टाकुयात, भारतीय संस्कृतीच्या ठेकेदारांच्या अशाच काही वादग्रस्त वक्तव्यांवर... 

'बीबीसी'ची 'इंडियाज डॉटर' ही डॉक्युमेंटरी सध्या भलतीच वादात आहे... या डॉक्युमेंटरीवर भारतीय सरकारनं बॅन जाहीर केल्यामुळे तर अनेक जण मिळवून मिळवून ती डॉक्युमेंटरी पाहत आहेत... कारण, ती सोशल वेबसाईटवर सहज पाहायला मिळतेय.  खरं म्हणजे, डॉक्युमेंटरी आणि बीबीसीचा व्यवहारीपणा आपण थोड्या वेळ बाजुला ठेवला तर लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये भारतीय पुरुषांची मानसिकता किती खालच्या दर्जाची आहे. इतकंच काय तर, परंपरेनं आलेल्या आणि त्या आहेत तशाच स्वीकारलेल्या परंपरा आणि विचार यांमुळे काही स्त्रियांचीही मानसिकता यापेक्षा काही वेगळी नाही.  बरं, ही मानसिकता केवळ समाजातील खालच्या पातळीवर आढळणाऱ्या लोकांचीच आहे का तर तसं नाही... समाजात उच्च शिक्षित आणि विद्याविभूषित म्हणून मिरवणाऱ्यांचीही तीच मानसिकता आपल्याला आजही दिसते.  केवळ बीबीसीच्या व्हिडिओच्या निमित्ताने या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली एव्हढंच... या आधीही आपल्याला अनेकांनी अशीच वादग्रस्त वक्तव्य केलीतच की... आठवत नसतील तर चला... एक नजर टाकुयात, भारतीय संस्कृतीच्या ठेकेदारांच्या अशाच काही वादग्रस्त वक्तव्यांवर...