टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर भारी, ५ कारणं!

Mar 25, 2015, 15:41 PM IST
1/5

५. फॅन्सचा सपोर्ट

आता ज्या देशात क्रिकेटला खेळ नाही धर्म मानतात. तिथल्या फॅन्सचा सपोर्ट नेहमीच खास असतो. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाला प्रत्येक मॅचमध्ये भरघोस सपोर्ट मिळालाय. तिरंगा घेऊन हजारो प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचतात. मॅच भले ही ऑस्ट्रेलियामध्ये होतेय. पण सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय फॅन्स ऑस्ट्रेलियन फॅन्स पेक्षा जास्त संख्येनं असू शकतात. अशात टीम इंडियाला अजिबात वाटणार नाही की, ते परदेशातील पिचवर खेळत आहेत.

पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ऑकलँडमध्ये खेळण्याचा फायदा मिळाला होता. या मॅचमध्ये इतके किवी फॅन्स होते की, दक्षिण आफ्रिकन फिल्डर त्यांच्या आवाजामुळे चुकांवर चुका करतांना दिसले. 

धोनीनं क्वॉर्टर फायनल मॅचपूर्वी सांगितलं होतं की, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड तिरंग्यांनी भरलेला दिसेल आणि मॅचमध्येही असंच घडलं. आता मेलबर्ननंतर सिडनीमध्येही असाच नजारा पाहायला मिळू शकतो. 

५. फॅन्सचा सपोर्ट आता ज्या देशात क्रिकेटला खेळ नाही धर्म मानतात. तिथल्या फॅन्सचा सपोर्ट नेहमीच खास असतो. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाला प्रत्येक मॅचमध्ये भरघोस सपोर्ट मिळालाय. तिरंगा घेऊन हजारो प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचतात. मॅच भले ही ऑस्ट्रेलियामध्ये होतेय. पण सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय फॅन्स ऑस्ट्रेलियन फॅन्स पेक्षा जास्त संख्येनं असू शकतात. अशात टीम इंडियाला अजिबात वाटणार नाही की, ते परदेशातील पिचवर खेळत आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ऑकलँडमध्ये खेळण्याचा फायदा मिळाला होता. या मॅचमध्ये इतके किवी फॅन्स होते की, दक्षिण आफ्रिकन फिल्डर त्यांच्या आवाजामुळे चुकांवर चुका करतांना दिसले.  धोनीनं क्वॉर्टर फायनल मॅचपूर्वी सांगितलं होतं की, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड तिरंग्यांनी भरलेला दिसेल आणि मॅचमध्येही असंच घडलं. आता मेलबर्ननंतर सिडनीमध्येही असाच नजारा पाहायला मिळू शकतो. 

2/5

४. कांगारू पिचवर नाराज

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एकूण ११ खेळपट्ट्या आहेत. त्यातील एक पिच रिटायर्ड झालीय. सेमीफायनल मॅचसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पिचवर गवताची मागणी केली होती. ज्यामुळं त्यांच्या बॉलर्सना चांगला स्विंग आणि बाऊंस मिळू शकेल. मात्र आयसीसीनं असं करण्यास नकार दिलाय. अशात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पिच हळू होण्याची शक्यता आहे, जी की स्पिनर्ससाठी चांगली असेल.

ऑस्ट्रेलियन टीममध्ये कुणीही तज्ज्ञ स्पिनर नाहीय. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टॉस सुद्धा मोठा फॅक्टर ठरेल. इथं पहिले बॅटिंग करणारी टीम सुद्धा जिंकलेली आहे आणि स्कोअर चेज करणारी टीमही. अशात ऑस्ट्रेलिया पिच बाबतीतही निराश आहे. 

४. कांगारू पिचवर नाराज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एकूण ११ खेळपट्ट्या आहेत. त्यातील एक पिच रिटायर्ड झालीय. सेमीफायनल मॅचसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पिचवर गवताची मागणी केली होती. ज्यामुळं त्यांच्या बॉलर्सना चांगला स्विंग आणि बाऊंस मिळू शकेल. मात्र आयसीसीनं असं करण्यास नकार दिलाय. अशात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पिच हळू होण्याची शक्यता आहे, जी की स्पिनर्ससाठी चांगली असेल. ऑस्ट्रेलियन टीममध्ये कुणीही तज्ज्ञ स्पिनर नाहीय. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टॉस सुद्धा मोठा फॅक्टर ठरेल. इथं पहिले बॅटिंग करणारी टीम सुद्धा जिंकलेली आहे आणि स्कोअर चेज करणारी टीमही. अशात ऑस्ट्रेलिया पिच बाबतीतही निराश आहे. 

3/5

३. बॉलिंगचा ७मध्ये ७०चा रेकॉर्ड

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी त्यांची बॉलिंग मानली जात होती. मात्र टीम इंडियाच्या बॉलर्सनी ७ मॅचमध्ये ७० विकेट काढून हे स्पष्ट केलंय की, ते कोणत्याही बॅटिंग ऑर्डरला संपवू शकतात. पेस अटॅकमध्ये मोहम्मद शामी, उमेश यादव आणि मोहित शर्मानं विकेट घेतल्या तर रन्सवर अंकुश लावण्याचं आणि ब्रेकथ्रू मिळविण्याचं काम आर. अश्विननं चांगल्या पद्धतीनं केलं. रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनानं सुद्धा गरज पडल्यास चांगली बॉलिंग केलीय. 

ऑस्ट्रेलियन बॅट्समननं ज्या भारतीय बॉलर्सची धुलाई ट्राय सीरिजमध्ये केली होते. त्यांनी त्याचा बदला वर्ल्डकपमध्ये घेतलाय. अशातच कांगारू बॅट्समनना भारतीय बॉलिंगपासून सावध राहावं लागेल. 

३. बॉलिंगचा ७मध्ये ७०चा रेकॉर्ड वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी त्यांची बॉलिंग मानली जात होती. मात्र टीम इंडियाच्या बॉलर्सनी ७ मॅचमध्ये ७० विकेट काढून हे स्पष्ट केलंय की, ते कोणत्याही बॅटिंग ऑर्डरला संपवू शकतात. पेस अटॅकमध्ये मोहम्मद शामी, उमेश यादव आणि मोहित शर्मानं विकेट घेतल्या तर रन्सवर अंकुश लावण्याचं आणि ब्रेकथ्रू मिळविण्याचं काम आर. अश्विननं चांगल्या पद्धतीनं केलं. रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनानं सुद्धा गरज पडल्यास चांगली बॉलिंग केलीय.  ऑस्ट्रेलियन बॅट्समननं ज्या भारतीय बॉलर्सची धुलाई ट्राय सीरिजमध्ये केली होते. त्यांनी त्याचा बदला वर्ल्डकपमध्ये घेतलाय. अशातच कांगारू बॅट्समनना भारतीय बॉलिंगपासून सावध राहावं लागेल. 

4/5

२. बॅट्समनची फौज

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद म्हणजे टीम इंडियाच्या बॅट्समनची फौज. टीमचा प्रत्येक खेळाडू आपलं संपूर्ण योगदान देतो. टीम कोणत्याही एका बॅट्समनवर अवलंबून राहत नाही आणि कुणी आऊट झाल्यानंतर टीम अस्ताव्यस्त होत नाही. जर टॉप ऑर्डर फेल झाली तर मिडल ऑर्डर रन करतात. जर मिडल ऑर्डर फेल झाली तर लोअर मिडल ऑर्डर मॅच सांभाळते. 

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, धोनी, रविंद्र जडेजा पर्यंत बॅट्समनची फौज आहे. यातील प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. अशात कांगारूंच्या बॉलर्सची समस्या वाढू शकते. 

२. बॅट्समनची फौज वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद म्हणजे टीम इंडियाच्या बॅट्समनची फौज. टीमचा प्रत्येक खेळाडू आपलं संपूर्ण योगदान देतो. टीम कोणत्याही एका बॅट्समनवर अवलंबून राहत नाही आणि कुणी आऊट झाल्यानंतर टीम अस्ताव्यस्त होत नाही. जर टॉप ऑर्डर फेल झाली तर मिडल ऑर्डर रन करतात. जर मिडल ऑर्डर फेल झाली तर लोअर मिडल ऑर्डर मॅच सांभाळते.  शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, धोनी, रविंद्र जडेजा पर्यंत बॅट्समनची फौज आहे. यातील प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. अशात कांगारूंच्या बॉलर्सची समस्या वाढू शकते. 

5/5

१. आमच्याकडे बेस्ट कॅप्टन आहे 

टीम इंडियाजवळ कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आहे. ज्याचा रेकॉर्ड मायकल क्लार्कपेक्षा चांगला आहे. २००७मध्ये वर्ल्ड टी-२०टी फायनल, २०११च्या वर्ल्डकपची फायनल किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. धोनीनं प्रत्येक वेळी आपल्या कॅप्टनसीनं मॅच विजयाकडे खेचून नेली. एवढंच नव्हे तर आयपीएलच्या मॅचेसमध्येही धोनीच्या कॅप्टनसीटी स्तुती होते. जितकी मोठी मॅच असते , तितकीच धोनीची कप्तानी बहरून येते. 
 
तर दुसरीकडे मायकल क्लार्कनं आपल्या कॅप्टन्सीमध्ये ऑस्ट्रेलियाला अशी मोठी टूर्नामेंट जिंकून दिली नाहीय. दबावात दमदार कप्तानी करण्यात क्लार्क अपयशी ठरतो. 

१. आमच्याकडे बेस्ट कॅप्टन आहे  टीम इंडियाजवळ कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आहे. ज्याचा रेकॉर्ड मायकल क्लार्कपेक्षा चांगला आहे. २००७मध्ये वर्ल्ड टी-२०टी फायनल, २०११च्या वर्ल्डकपची फायनल किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. धोनीनं प्रत्येक वेळी आपल्या कॅप्टनसीनं मॅच विजयाकडे खेचून नेली. एवढंच नव्हे तर आयपीएलच्या मॅचेसमध्येही धोनीच्या कॅप्टनसीटी स्तुती होते. जितकी मोठी मॅच असते , तितकीच धोनीची कप्तानी बहरून येते. 
 
तर दुसरीकडे मायकल क्लार्कनं आपल्या कॅप्टन्सीमध्ये ऑस्ट्रेलियाला अशी मोठी टूर्नामेंट जिंकून दिली नाहीय. दबावात दमदार कप्तानी करण्यात क्लार्क अपयशी ठरतो.