गतवर्षीच्या चर्चेतील अभिनेत्री

Dec 25, 2012, 15:46 PM IST
1/11

विद्या बालन‘उलाला उलाला...’ करत सगळ्या देशातील सभ्यतांनाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडणाऱ्या विद्या बालननं २००१ साली ‘द डर्टी पिक्चर’मध्ये पहिल्यांदाच बोल्ड सीन दिले. पण, तिच्या अभिनयानं या बोल्डपणालाही एका सोज्ज्वळतेची झलक मिळाली. त्यानंतर ती दिसली एका गंभीर भूमिकेत... ‘कहानी’मध्ये... मुख्य भूमिकेतील स्त्रीपात्र विद्यानं मोठ्या खूबीनं वठवलं. इतकं की ती बॉलिवूडमधल्या ‘खान’ नावाला टक्कर देणारी पहिली अभिनेत्री ठरली. ३४ वर्षांच्य विद्यानं बॉलिवूडमधल्या पुरुषप्रधान संस्कृतीलाच हादरा दिला होता.

विद्या बालन
‘उलाला उलाला...’ करत सगळ्या देशातील सभ्यतांनाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडणाऱ्या विद्या बालननं २००१ साली ‘द डर्टी पिक्चर’मध्ये पहिल्यांदाच बोल्ड सीन दिले. पण, तिच्या अभिनयानं या बोल्डपणालाही एका सोज्ज्वळतेची झलक मिळाली. त्यानंतर ती दिसली एका गंभीर भूमिकेत... ‘कहानी’मध्ये... मुख्य भूमिकेतील स्त्रीपात्र विद्यानं मोठ्या खूबीनं वठवलं. इतकं की ती बॉलिवूडमधल्या ‘खान’ नावाला टक्कर देणारी पहिली अभिनेत्री ठरली. ३४ वर्षांच्य विद्यानं बॉलिवूडमधल्या पुरुषप्रधान संस्कृतीलाच हादरा दिला होता.

2/11

सोनाक्षी सिन्हातिला अजून उत्तम अभिनयाचा खिताब मिळाला नसेल किंवा तिची फारशी स्तुतीही झाली नसेल पण तिला पदार्पणातच बॉलिवूडमधल्या ‘स्टार्स’ बरोबर काम करण्याची संधी मिळत गेली ती तिच्या अभिनयामुळेच. तिनं सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीचा अभिनय प्रेक्षकांसमोर मांडलाय. तिचा सहभाग असलेला ‘रावडी राठोड’ आणि ‘सन ऑफ सरदार’ शंभर करोडच्या क्लबमध्ये सहज सहभागी झाले. आणि तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘दबंग २’ बॉलिवूडवर हिट ठरण्याची पूरेपूर शक्यता वर्तवण्यात येतेय.

सोनाक्षी सिन्हा
तिला अजून उत्तम अभिनयाचा खिताब मिळाला नसेल किंवा तिची फारशी स्तुतीही झाली नसेल पण तिला पदार्पणातच बॉलिवूडमधल्या ‘स्टार्स’ बरोबर काम करण्याची संधी मिळत गेली ती तिच्या अभिनयामुळेच. तिनं सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीचा अभिनय प्रेक्षकांसमोर मांडलाय. तिचा सहभाग असलेला ‘रावडी राठोड’ आणि ‘सन ऑफ सरदार’ शंभर करोडच्या क्लबमध्ये सहज सहभागी झाले. आणि तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘दबंग २’ बॉलिवूडवर हिट ठरण्याची पूरेपूर शक्यता वर्तवण्यात येतेय.

3/11

करिना कपूरबॉलिवूडमधल्या ‘कपूर’ घराण्याच्या या मुलीला प्रेक्षकांनी यावर्षी वेगवेगळ्या रुपांत पाहिलंय. ‘एक मै और एक तू’मध्ये ती एका हेअरड्रेसरच्या भूमिकेत दिसली तर ‘एजंट विनोद’मध्ये पाकिस्तानी डॉक्टरच्या... यावर्षी आलेला ‘हिरोईन’ हा तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला एक जबरदस्त टप्पा ठरला. एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीची भूमिका तिनं या सिनेमातून प्रेक्षकांसमोर अशी काही मांडली की प्रेक्षक तिच्या अभिनयावर फिदाच झाले. ‘तलाश’मध्ये एका वेश्येची भूमिका साकारूनही तिच्या इमेजला धक्का लागला नाही. तिला अभिनयाची पूरेपूर जाण आहे आणि ती नक्कीच इतर अभिनेत्रींना वरचढ ठरू शकते, असं कुणी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमांशिवाय करिनाचं सैफ अली खान बरोबर झालेलं लग्न हादेखील बॉलिवूडमधला एक चर्चेचा आणि सेलिब्रेशनचा विषय ठरला होता.

करिना कपूर
बॉलिवूडमधल्या ‘कपूर’ घराण्याच्या या मुलीला प्रेक्षकांनी यावर्षी वेगवेगळ्या रुपांत पाहिलंय. ‘एक मै और एक तू’मध्ये ती एका हेअरड्रेसरच्या भूमिकेत दिसली तर ‘एजंट विनोद’मध्ये पाकिस्तानी डॉक्टरच्या... यावर्षी आलेला ‘हिरोईन’ हा तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला एक जबरदस्त टप्पा ठरला. एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीची भूमिका तिनं या सिनेमातून प्रेक्षकांसमोर अशी काही मांडली की प्रेक्षक तिच्या अभिनयावर फिदाच झाले. ‘तलाश’मध्ये एका वेश्येची भूमिका साकारूनही तिच्या इमेजला धक्का लागला नाही. तिला अभिनयाची पूरेपूर जाण आहे आणि ती नक्कीच इतर अभिनेत्रींना वरचढ ठरू शकते, असं कुणी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमांशिवाय करिनाचं सैफ अली खान बरोबर झालेलं लग्न हादेखील बॉलिवूडमधला एक चर्चेचा आणि सेलिब्रेशनचा विषय ठरला होता.

4/11

अनुष्का शर्मासिनेमा जगताशी निगडीत कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका चुलबुलत्या तरुणीनं केवळ आत्मविश्वासाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल टाकलं. तिच्या अभिनय क्षमतेमुळेच तिला यश राज चोप्रा यांच्या शेवटच्या ‘जब तक है जान’मध्ये संधी मिळाली. शाहरुख खान, कतरिना कैफ ही जोडी सिनेमात असूनदेखील या सिनेमातील चुलबुली अनुष्का प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिली.

अनुष्का शर्मा
सिनेमा जगताशी निगडीत कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका चुलबुलत्या तरुणीनं केवळ आत्मविश्वासाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल टाकलं. तिच्या अभिनय क्षमतेमुळेच तिला यश राज चोप्रा यांच्या शेवटच्या ‘जब तक है जान’मध्ये संधी मिळाली. शाहरुख खान, कतरिना कैफ ही जोडी सिनेमात असूनदेखील या सिनेमातील चुलबुली अनुष्का प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिली.

5/11

प्रियांका चोप्राबहुरंगी व्यक्तीमत्त्व असलेली प्रियांका चोप्रा ‘दोस्ताना’ आणि ‘अंजाना अंजानी’ एका आधुनिक मुलीच्या रुपात दिसली. याच प्रियांकाला जेव्हा ‘झिलमिल’च्या रुपात पाहिली तेव्हा प्रियांकाच्या अभिनयाचा सखोलता प्रेक्षकांच्या मनात भरली. ‘बर्फी’ या सिनेमातली झिलमिल - एक ऑटीस्टीक पीडित बंगाली मुलगीच्या भूमिकेला प्रियांकानं पूरेपूर न्याय दिला. केवळ एक सुंदर बाहुली म्हणून न राहता तिनं अभिनयात आपला ठसा उमटवला. एव्हढंच नाही तर ‘इन माय सिटी’ या आंतरराष्ट्रीय अल्बममध्ये तिनं गाण गाऊन प्रेक्षकांना चकीत करून टाकलंय. एक गायिका म्हणूनही प्रेक्षकांनी तिला सहज स्वीकारलंय.

प्रियांका चोप्रा
बहुरंगी व्यक्तीमत्त्व असलेली प्रियांका चोप्रा ‘दोस्ताना’ आणि ‘अंजाना अंजानी’ एका आधुनिक मुलीच्या रुपात दिसली. याच प्रियांकाला जेव्हा ‘झिलमिल’च्या रुपात पाहिली तेव्हा प्रियांकाच्या अभिनयाचा सखोलता प्रेक्षकांच्या मनात भरली. ‘बर्फी’ या सिनेमातली झिलमिल - एक ऑटीस्टीक पीडित बंगाली मुलगीच्या भूमिकेला प्रियांकानं पूरेपूर न्याय दिला. केवळ एक सुंदर बाहुली म्हणून न राहता तिनं अभिनयात आपला ठसा उमटवला. एव्हढंच नाही तर ‘इन माय सिटी’ या आंतरराष्ट्रीय अल्बममध्ये तिनं गाण गाऊन प्रेक्षकांना चकीत करून टाकलंय. एक गायिका म्हणूनही प्रेक्षकांनी तिला सहज स्वीकारलंय.

6/11

कतरिना कैफ२०१२ मध्ये धड हिंदीही न बोलता येणारी कतरिना तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली. पहिल्यांदा अग्निपथमधल्या ‘चिकनी चमेली’च्या रुपात तीनं आयटम साँगची व्याख्याच बदलून टाकली. तेव्हापर्यंत आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतलाही कतरिनाच्या या परफॉर्मन्सनं धडकी भरली होती. त्यानंतर ती दिसली पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या रुपात ‘एक था टायगर’मध्ये... आणि त्यानंतर आलेल्या ‘जब तक है जान’मध्ये तर तीनं शाहरुखलाच टक्कर दिली. यश चोप्रा यांची शेवटची अभिनेत्री कतरिनाच ठरली.

कतरिना कैफ
२०१२ मध्ये धड हिंदीही न बोलता येणारी कतरिना तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली. पहिल्यांदा अग्निपथमधल्या ‘चिकनी चमेली’च्या रुपात तीनं आयटम साँगची व्याख्याच बदलून टाकली. तेव्हापर्यंत आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतलाही कतरिनाच्या या परफॉर्मन्सनं धडकी भरली होती. त्यानंतर ती दिसली पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या रुपात ‘एक था टायगर’मध्ये... आणि त्यानंतर आलेल्या ‘जब तक है जान’मध्ये तर तीनं शाहरुखलाच टक्कर दिली. यश चोप्रा यांची शेवटची अभिनेत्री कतरिनाच ठरली.

7/11

श्रीदेवी‘मिस हवाहवाई’नं यावर्षी बॉलिवूडमध्ये असं काही कमबॅक केलं की तिच्या वयाच्या नट्यांना तिचा हेवा वाटावा... ‘इंग्लिश विंग्लिश’मधून तिनं एका सामान्य गृहिणीची भूमिका पार पाडली. पण, ही साधीसूधी भूमिकाही श्रीदेवीच्या अभिनयानं उजळून निघाली. तब्बल १५ वर्षानंतर श्रीदेवीनं बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पणाची चव चाखली. या भूमिकेतून तिनं फक्त सामान्य मिडल क्लास गृहिणींचच मन जिंकलं नाही तर तिनं तिच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींना बोटं चाखायला लावली.

श्रीदेवी
‘मिस हवाहवाई’नं यावर्षी बॉलिवूडमध्ये असं काही कमबॅक केलं की तिच्या वयाच्या नट्यांना तिचा हेवा वाटावा... ‘इंग्लिश विंग्लिश’मधून तिनं एका सामान्य गृहिणीची भूमिका पार पाडली. पण, ही साधीसूधी भूमिकाही श्रीदेवीच्या अभिनयानं उजळून निघाली. तब्बल १५ वर्षानंतर श्रीदेवीनं बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पणाची चव चाखली. या भूमिकेतून तिनं फक्त सामान्य मिडल क्लास गृहिणींचच मन जिंकलं नाही तर तिनं तिच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींना बोटं चाखायला लावली.

8/11

हळूवार अन्ं बेधडक...स्टनिंग श्रीदेवीचं कमबॅक, हुमा कुरेशीची बॉलिवूडमधली एन्ट्री किंवा प्रियांका चोप्राचा एका ‘ऑटीस्टीक’ पीडित मुलीची भूमिका... २०१२ साल लक्षात राहिलं ते बॉलिवूडमधल्या या सुंदर बालांच्या विविधांगी व्यक्तीमत्त्व दर्शवणाऱ्या भूमिकांनी... संपूर्ण वर्षभरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नट्यांवर ही एक नजर...

हळूवार अन्ं बेधडक...
स्टनिंग श्रीदेवीचं कमबॅक, हुमा कुरेशीची बॉलिवूडमधली एन्ट्री किंवा प्रियांका चोप्राचा एका ‘ऑटीस्टीक’ पीडित मुलीची भूमिका... २०१२ साल लक्षात राहिलं ते बॉलिवूडमधल्या या सुंदर बालांच्या विविधांगी व्यक्तीमत्त्व दर्शवणाऱ्या भूमिकांनी... संपूर्ण वर्षभरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नट्यांवर ही एक नजर...

9/11

हुमा कुरेशी‘गँग्स ऑफ वास्सेपूर’मधल्या बोल्ड परफॉर्मन्ससाठी हुमाला सगळ्यांकडूनच ‘थम्स अप’ मिळाला. ‘लव शव थे चिकन खुराना’ या सिनेमातूनही ती बेधडकपणे पडद्यावर वावरली.

हुमा कुरेशी
‘गँग्स ऑफ वास्सेपूर’मधल्या बोल्ड परफॉर्मन्ससाठी हुमाला सगळ्यांकडूनच ‘थम्स अप’ मिळाला. ‘लव शव थे चिकन खुराना’ या सिनेमातूनही ती बेधडकपणे पडद्यावर वावरली.

10/11

दीपिका पदुकोणइम्तियाज अलीच्या ‘कोकटेल’मधून एक बोल्ड आणि काळजीवजा मुलीच्या अवतारात दीपिका यावर्षी प्रेक्षकांसमोर आली. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती केवळ तिच्या आत्मविश्वासामुळे

दीपिका पदुकोण
इम्तियाज अलीच्या ‘कोकटेल’मधून एक बोल्ड आणि काळजीवजा मुलीच्या अवतारात दीपिका यावर्षी प्रेक्षकांसमोर आली. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती केवळ तिच्या आत्मविश्वासामुळे

11/11

परिणीती चोप्रा‘लेडीज वर्सेस रिकी बेहल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणीतीनं बॉलिवूडमध्ये एक नवी जान आणली. ‘इश्कजादें’नं तिच्यातील बेधडक अभिनेत्री खऱ्या रुपात प्रेक्षकांसमोर आली. तिची पहिली ओळख म्हणजे प्रियांका चोप्राची चुलत बहिण, पण इश्कजादेनं एक अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण केली. तिच्या साध्या पंजाबी लूकनंही तरुणाईला भुरळ पाडली.

परिणीती चोप्रा
‘लेडीज वर्सेस रिकी बेहल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणीतीनं बॉलिवूडमध्ये एक नवी जान आणली. ‘इश्कजादें’नं तिच्यातील बेधडक अभिनेत्री खऱ्या रुपात प्रेक्षकांसमोर आली. तिची पहिली ओळख म्हणजे प्रियांका चोप्राची चुलत बहिण, पण इश्कजादेनं एक अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण केली. तिच्या साध्या पंजाबी लूकनंही तरुणाईला भुरळ पाडली.