व्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग

चोपडीपूजनासाठी मुंबईतील झवेरी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची लगबग सुरु आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 19, 2017, 10:54 AM IST
व्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग  title=

मुंबई : आज लक्ष्मीपूजन सगळीकडे उत्साहात साजरी केली जात आहे. आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तमाम व्यापारी वर्गाची चोपडी पूजनासाठी लगबग सुरु झालीये.. याआधीच्या चोपड्यांचे व्यवहार पूर्ण करुन नवीन चोपड्या विकत घेवून त्यांचं विधीवत लक्ष्मीपूजन केलं जातं. चोपडीपूजनासाठी मुंबईतील झवेरी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची लगबग सुरु आहे.

मुंबईत चोपडी विकत घेऊन ती सर्वात आधी मुंबादेवीच्या चरणी अर्पण करण्याची प्रथा आहे. वर्षभर वापरात येणाऱ्या या चोपड्यांवर स्वस्तिक काढून, हळद कुंकवाचा अभिषेक करुन बताशांचा नैवेद्य दाखवला जातो.