दिवाळी २०१७: काय आहे नरकचतुर्दशीचे महत्व?

दिवाळी सुरू होऊन आज तीन दिवस झाले आहेत. काल धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर आज सगळीकडे नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

Updated: Oct 18, 2017, 08:02 AM IST
दिवाळी २०१७: काय आहे नरकचतुर्दशीचे महत्व? title=

मुंबई : दिवाळी सुरू होऊन आज तीन दिवस झाले आहेत. काल धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर आज सगळीकडे नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. 

कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती. कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साज त्यास खूप नंतर चढवण्यात आला असावा.

हनुमानाची पूजा?

मान्यतेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान हनुमानने माता अंजनाच्या पोटी जन्म घेतला होता. या दिवशी भक्त भविक दु:ख आणि भीतीपासून सुटका मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा करतात.