या राशीच्या व्यक्ती सतत प्रेमात पडतात...

राशीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव  वेगवेगळा असतो. काही राशी अधिक रागीट असतात तर काही राशी सौम्य स्वभावाच्या होत्या.

Updated: Nov 16, 2018, 06:33 PM IST
या राशीच्या व्यक्ती सतत प्रेमात पडतात...

मुंबई : राशीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव  वेगवेगळा असतो. काही राशी अधिक रागीट असतात तर काही राशी सौम्य स्वभावाच्या होत्या. प्रेमाच्या बाबतीत सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही राशींच्या व्यक्तीं एकदाच प्रेमात पडतात तर काहींना तीन ते चार वेळा प्रेम होते. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्ती किती वेळा प्रेमात पडतात

मेष राशि:

या राशींच्या व्यक्तींसाठी प्रेम ही संवेदनशील गोष्ट आहे. प्रेमात गंभीर असतात. बिनधास्तपणे प्रेम व्यक्त करतात. प्रपोज करण्यातही मागे हटत नाहीत.

वृषभ राशि:

या राशीच्या व्यक्तीही प्रेमात गंभीर असतात. मात्र एखाद्याच्या लगेच प्रेमात पडतात. यांना आयुष्यात कमीत कमी दोनवेळा प्रेम होते.

मिथुन राशि:

या राशीच्या व्यक्ती पटकन प्रेमात पडतात. अनेकदा एका रिलेशनमध्ये असताना दुसऱ्या रिलेशनशिपचा विचार करतात. या आयुष्यात तीन ते चार वेळा प्रेमात पडतात.

कर्क राशि:

या राशीच्या व्यक्ती परफेक्ट लव्हर असतात. मात्र या पार्टनरकडून खूप जास्त आणि काल्पनिक अपेक्षा ठेवता. या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि दुखी होतात.

सिंह राशि:

या राशीच्या व्यक्ती प्रेमात फार चंचल असतात. प्रेमात एकदा धोका मिळाल्यास त्या पुन्हा प्रेमात पडण्याबाबत सतर्क होतात.

कन्या राशि:

या राशीच्या व्यक्ती दुसऱ्यांवर प्रेम करण्याआधी स्वत:वर प्रेम करतात. आयुष्यात एकाच व्यक्तीवर प्रेम करतात. 

तुला राशि:

या राशीच्या व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडल्यास त्या व्यक्तीला लगेचच फॉर ग्रांटेड धरतात. मात्र काही काळानंतर त्यांना याची जाणीव होते.

वृश्चिक राशि:
या राशीच्या व्यक्ती खूप प्रॅक्टिकल असतात. त्यामुळेच त्याच पद्धतीने पार्टनर निवडतात.

धनु राशि:

धनू राशीच्या व्यक्ती सहज प्रेमात पडतात. आयुष्यात या व्यक्ती कमीत कमी ४ वेळा तरी प्रेमात पडतात. 

मकर राशि:

या व्यक्ती अधिक महत्त्वाकांक्षी असतात. प्रेमाच्या बाबतीतही यांचा असाच स्वभाव असतो. 

कुंभ राशि:

या राशीच्या व्यक्ती खुलेपणाने प्रेम करतात. आयुष्यात दोनदा तरी प्रेमात पडतातच.

मीन राशि:

या राशीच्या व्यक्तींना परीकथेप्रमाणे आपली प्रेम कहाणी हवी असते. आयुष्यात एकदाच एखाद्यावर प्रेम करतात मात्र ते प्रेम धोका देईल या भितीने सचेत असतात.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close