आजचे राशीभविष्य | सोमवार | ७ जानेवारी २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?   

Updated: Jan 8, 2019, 07:50 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | ७ जानेवारी २०१९ title=

मेष- दिवस शुभ असेल. चांगली बातमी कळेल. बऱ्याच गोष्टींचा गुंता अगदी सहजपणे सुटेल. काही गोष्टींवर विचारपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न केलात तर, त्यात यशस्वी व्हाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. चांगल्या कामांची प्रशंसा होणार. 

वृषभ- काही अशा व्यक्तींची भेट होण्याची शक्यता ज्यांच्याकडे अर्थार्जनाच्या चांगल्या योजना आहेत. त्यांच्या मदतीने तुमचीही आर्थिक परिस्थिती सुधारेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नव्या संधी मिळतील. साथीराची मानसिक साथही लाभेल. 

मिथुन -आज शांत राहून आपल्या शरीरावर आणि मनाकडे लक्ष केंद्रीत करा. तसेच तुमच्या संपर्काच्या यादीत भर पडणार. शक्य तितके व्यवहारीक व्हा. काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. जर काही खास कार्य करण्याच्या तयारीत असाल तर त्याला थोडा वेळ देणे योग्य ठरेल. याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.   

सिंह- जवळच्या संबंधांमध्ये काही आवश्यक बदल घडू शकतात. बऱ्याच समस्यांचं निवारण होऊ शकतं. आपल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. जवळच्या मित्रांसह रुचीपूर्ण संभाषण होईल. आसपासच्या धार्मिक किंवा राजकीय विकासाचा फायदा आपल्याला मिळू शकतो.

कन्या- नवीन कामाची सुरुवात होणार आहे. थांबलेले काम आज पूर्ण होतील. कार्यलयात अधिक श्रमाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अधिक श्रमाचा फायदा आपल्याला फायदा मिळू शकतो. इतरांना मदत करावी लागेल. घरापासून दूर जाण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारांवर नजर टाका त्याने फायदा होईल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणार. घर खरेदी करायचं असेल, तर आजचा दिवस यशस्वी ठरणार आहे. 

तूळ - नवीन काही शिकायला मिळणार. कार्यलयात कनिष्ठ कामगारांकडून सहकार्य प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी सकारात्मक विचार करा. काही कालावधीनंतर सर्वकाही ठीक होईल. नवीन लोकांच्या भेटीसाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते. रोमन्ससाठी वेळ काढा. सर्जनशील कार्यात यश मिळणार. धीर धरा आणि अधिक काम करा.

वृश्चिक  - आपल्या जबाबदारीमध्ये भर पडणार आहे. धार्मिक आणि समाजिक कामासाठी वेळ काढू शकणार. कुटुंबासह वेळ घालवता येणार आहे. समस्यांचे निवारण होणार आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवहारात वाढ होऊ शकते. चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांना आनंद प्राप्त होणार. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

धनु - घर खरेदी कराचचे असेल, तर आजचा दिवस यशस्वी ठरणार आहे. नवीन लोकांना भेटण्यासाठी आजचा दिवस उत्तम ठरेल. महत्वाच्या कामाची आज सुरुवात होऊ शकते. एखाद्याला सहकार्य करण्यात आपला वाटा असू शकतो. आपल्या कामात लक्ष केंद्रीत करा. खूप दिवसांपासून नियोजन करत असलेल्या कामाची आज सुरुवात करणे योग्य ठरेल. 

मकर- आज आपण काही मनोरंजक आणि नवीन संधी प्राप्त करु शकता. चंद्र आपल्या राशीमध्ये राहील. नवीन सुरू करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने काम करा. नकारात्मक विचारांवर दुर्लक्ष करा. बर्याच समस्यांचे वेळेनुसार निवारण केले जाऊ शकते. आपण विवाह प्रस्ताव देखील मिळवू शकता. व्यवसायात बदल होऊ शकतो. राजकीय क्षेत्रासाठी चांगला वेळ आहे.

कुंभ- शिक्षण आणि संततीकडे तुमचं लक्ष असेल. सकारात्मक दृष्टीकोन असेल. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळतील. बेत आखा आणि वाट पाहा. काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. आजूबाजूचे तुमच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढतील. खर्च होण्याची शक्यता. साथीदाराशी मतभेद होऊ शकतात. 

मीन- प्रेमाची व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. ज्यांना तुमची गरज आहे, त्यांच्याशी भेट होण्याची शक्यता. काही बाबतीत तुमचे विचार बदलतील, जे गरजेचे असतील. कामाच्या ठिकाणी यश संपादन कराल ज्याचं श्रेय तुम्हाला मिळेल.