पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाचा फिंचला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे आणि तीन टी-20 च्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.

Updated: Sep 14, 2017, 07:42 PM IST
पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाचा फिंचला दुखापत

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे आणि तीन टी-20 च्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे. पण या मॅचआधी ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर ऍरोन फिंचच्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्या रविवारच्या मॅचमध्ये खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

चेन्नईच्या चिदंबरम स्डेडियममध्ये सराव करत असताना फिंचच्या पायाला दुखापत झाली. यानंतर फिंचनं सराव न करता दिवसभर आराम केला. पहिल्या वनडेमध्ये फिंच खेळू शकला नाही तर त्याच्याऐवजी ट्रेव्हिस हेड किंवा हिल्टन कार्टराईटला संधी मिळू शकते. मंगळवारी झालेल्या सराव सामन्यामध्येही फिंच खेळला नव्हता. सहा आठवड्यांपूर्वी इंग्लंडमध्ये सरे काऊंटीकडून खेळताना फिंच दुखापतग्रस्त झाला होता.