अंडर १९ वर्ल्डकप : ओवर एजमुळे टीम इंडियाचा खेळाडू वादात

वय जास्त असूनही अनुकूल अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2018, 11:48 PM IST
अंडर १९ वर्ल्डकप : ओवर एजमुळे टीम इंडियाचा खेळाडू वादात

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या धरतीवर अंडर १९ वर्ल्डकप जिंकणारी टीम इंडियाचा खेळाडू एका वाईट कारणामूळे चर्चेत आहे.

बिहारमध्ये राहणाऱ्या आणि झारखंडमधून खेळणाऱ्या अनुकूल रॉयवर आरोप होत आहेत. वय जास्त असूनही अनुकूल अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

जल्लोष फिका ?

राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने चौथ्यांदा वर्ल्डकप आपल्या नावे केला. पण या विवादाने जल्लोष फिका पडण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा खुलासा करणारे याचिकाकर्ता आदित्य वर्माने धक्कादायक दावा केलाय. 

मुंबई इंडियन्समधून खेळणार 

अनुकूलला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केलयं. स्वत: बीसीसीआयने आदित्य वर्माला खेळण्यास परवानगी नाकारली होती.

पण सतत कायदे तोडणाऱ्या माजी बोर्ड सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांच्यामूळे त्याला संघात स्थान मिळाले.