काबुल हल्ल्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी तोडले क्रिकेट संबंध

 अफगाणिस्तानने बॉम्ब  स्फोटानंतर पाकिस्तानशी प्रस्तावित 'होम अँड अवे' क्रिकेट सामने रद्द केले आहे.  भारतीय दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संघटनेने माहिती दिली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 1, 2017, 08:20 PM IST
 काबुल हल्ल्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी तोडले क्रिकेट संबंध  title=

काबुल :  अफगाणिस्तानने बॉम्ब  स्फोटानंतर पाकिस्तानशी प्रस्तावित 'होम अँड अवे' क्रिकेट सामने रद्द केले आहे.  भारतीय दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संघटनेने माहिती दिली आहे.

पाकिस्तानला यावर्षांच्या अखेरीस काबुलमध्ये आपला पहिला टी-२० सामना खेळायचा होता.  तसेच काबुलमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या सामन्यांनंतर पाकिस्तानात एक सामना खेळविण्यात येणार होता. त्यानंतर एक संपूर्ण सिरीजची योजना होती. 

आता अफगाण क्रिकेट बोर्डाने फेसबूक पेजवर लिहिले की एसीबी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी क्रिकेट मॅच आणि परस्पर संबंध रद्द करीत आहे. 

शहरात झालेल्या ट्रक बॉम्ब स्फोटानंतर अफगाण क्रिकेट बोर्डाने कडक शब्दात सर्व सामने रद्द केले. या स्फोटात ९० नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. तालिबानने या हल्ल्यात सामील असल्याचा इन्कार केला.