विराट सेनेला 'sweeper संबोधल्यानंतर आता हा ब्लॉगर म्हणतोय 'Sachin Who'

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  गेल्यावर्षी भारतीय क्रिकेट संघाने इडन गार्डनची सफाई केली होती.

Updated: Sep 16, 2017, 02:38 PM IST
विराट सेनेला 'sweeper संबोधल्यानंतर आता हा ब्लॉगर म्हणतोय 'Sachin Who' title=

मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  गेल्यावर्षी भारतीय क्रिकेट संघाने ईडन गार्डनची सफाई केली होती.

या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करताना ऑस्ट्रेलियन ब्लॉगर डेनिस फ्रिडमॅनने भारतीय खेळाडू पाकिस्तानमधील लाहोरच्या मैदानावर रंगलेल्या विश्व इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी लाहोरच्या मैदानावर साफसफाईचे काम करत आहेत,असे कॅप्शन दिले होते. यावरून भारतासह पाकिस्तानी चाहत्यांनीही  डेनिस फ्रिडमॅनचा खरपूस समाचार घेतला होता. 

भारतीय क्रिकेटपटूंना सफाई कामगार संबोधल्यानंतर आता डेनिस फ्रिडमॅनने ट्विटरवर अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. 

'Sachin Who' असे कॅप्शन असलेले टीशर्ट घालून एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये 'हे घालून मी मॅच पाहणार आहे. तुम्ही काय घालताय? ' असा प्रश्न विचारला. या प्रश्नावरही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. 

 

अनेक फोटोशॉप केलेले फोटो या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून मिळत आहेत.