एअर हॉस्टेसच्या 'या' वागण्यावर काहींचे नाराजीचे सूर तर भज्जीचं मजेदार ट्विट

टीम इंडियामधून सद्ध्या बाहेर असलेला हरभजन सिंग सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. नेहमीच हमखास हरभजन सिंग चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. 

Updated: Jan 13, 2018, 03:47 PM IST
एअर हॉस्टेसच्या 'या' वागण्यावर काहींचे नाराजीचे सूर तर भज्जीचं मजेदार ट्विट

मुंबई : टीम इंडियामधून सद्ध्या बाहेर असलेला हरभजन सिंग सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. नेहमीच हमखास हरभजन सिंग चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. 

टर्बनेटर या नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने एअर होस्टेसचा व्हिडिओ शेअर केला आहे. हरभजनने हा व्हिडिओ शूट केलेला नसून त्याच्या सहप्रवाशांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. 

व्हिडिओमध्ये एअर होस्टेस पॅसेंजरसाठी असलेले अन्न फूड पॅकेट्समधून खाताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांचा राग अनावर झाला. 

हरभजन सिंगचे ट्विट 

हरभजन सिंग ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना म्हणाला, जर तुम्हांला विमानप्रवासामध्ये जेवणात चिकन कमी मिळाले तर कॉस्ट कटिंग नव्हे तर त्यामागील कारण हे आहे...  

 

हा प्रकार कोणत्या एअरलाईनसोबत झाला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.