पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक, कूकनं केले एवढे विक्रम

आपली शेवटची टेस्ट खेळणाऱ्या एलिस्टर कूकनं शेवटच्या इनिंगमध्ये शतक झळकावलं आहे.

Updated: Sep 10, 2018, 06:04 PM IST
पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक, कूकनं केले एवढे विक्रम title=

लंडन : आपली शेवटची टेस्ट खेळणाऱ्या एलिस्टर कूकनं शेवटच्या इनिंगमध्ये शतक झळकावलं आहे. आपल्या पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक करणारा एलिस्टर कूक हा पाचवा खेळाडू बनला आहे. मुख्य म्हणजे कूकनं त्याचं पहिलं शतकही भारताविरुद्धच झळकावलं होतं. कूकनं २००६ साली नागपूरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या टेस्टमध्ये कूकनं नाबाद १०४ रनची खेळी केली होती.

पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक 

१०४ | १४६- रेगी डफ 

११० | २६६- बिल पॉन्सफोर्ड

१०८ | १८२- ग्रेग चॅपल 

११० | १०२- मोहम्मद अजहरुद्दीन

कूकनं मोडलं संगकाराचं रेकॉर्ड 

या मॅचआधी सर्वाधिक टेस्ट रन बनवणारे टॉप ५ बॅट्समनमध्ये सचिन तेंडुलकर (१५,९२१), रिकी पाँटिंग (१३,३७८), जॅक कॅलिस(१३,२८९), राहुल द्रविड(१३,२८८) आणि कुमार संगकारा(१२,४००) होते. पण आता कूकनं संगकाराला मागे टाकत टॉप ५ मध्ये जागा मिळवली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये ७६वी रन केल्यानंतर कूक या यादीमध्ये पोहोचला. 

सर्वाधिक रन करणारा डावखुरा बॅट्समन 

याचबरोबर कूक टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारा डावखुरा बॅट्समन बनला आहे. कूकनंतर संगकारा(१२,४००), ब्रायन लारा(११,९५३) आणि शिवनारायण चंद्रपॉल(११,८६७) या डावखुऱ्या बॅट्समननी सर्वाधिक रन केले आहेत.