शुन्यावर आऊट झाल्याने धोनीवर असा संतापला हा छोटा फॅन

धोनी आल्यावर नाचणारा फॅन नंतर धोनीवरच संतापला

Updated: Sep 19, 2018, 12:48 PM IST
शुन्यावर आऊट झाल्याने धोनीवर असा संतापला हा छोटा फॅन title=

मुंबई : निजाकत खानने 92 आणि कर्णधार अंशुमन रथच्या 73 रनच्या जोरावर दोघांनी पहिल्या विकेटसाठी 174 रनची पार्टनरशिप केली. त्यांच्या या खेळीने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अनेकांचे मन जिंकलं. हाँगकाँगला आशिया कप-2018 च्या ग्रुप-ए मधील दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 26 रनने त्यांचा पराभव झाला. पण याच सामन्यात महेंद्र सिंह धोनीने अनेकांना निराश केलं. महेंद्र सिंह धोनी आशिया कप 2018 च्या पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाला. 322 वनडे मॅच खेळलेल्या धोनीला शुन्यावर आऊट होतांना पाहून त्याच्या एका चाहत्याने खूप संताप व्यक्त केला.

दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात धोनीने 3 बॉलमध्ये एकही रन नाही केला. धोनी आऊट झाल्यानंतर या छोट्या चाहत्याने मैदानावरच राग व्यक्त केला. त्याचा हा संताप कॅमेऱ्यात कैद झाला.

भारताने आधी बॅटींग करत 286 रन केले. हाँगकाँगने टॉस जिंकत भारताला आधी फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताने 40.3 ओव्हरमध्ये 240 रन केले होते. भारत एक मोठं टार्गेट असं वाटत होतं पण धवन आऊट झाल्यानंतर भारताला आणखी काही धक्के लागले. भारताने 7 विकेट गमवत 285 रन केले.