ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आजपासून २१ व्या कॉमनवेल्‍थ गेम्‍सची सुरुवात होणार आहे

shailesh musale Updated: Apr 4, 2018, 03:43 PM IST
ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आजपासून २१ व्या कॉमनवेल्‍थ गेम्‍सची सुरुवात होणार आहे. यामध्ये १३ अॅथलीट असे आहेत जे आपली छाप सोडण्यासाठी तयार आहेत. खेळाच्या दुनियेत चमकणाऱ्या या खेळाडुंमध्ये १५ वर्षाचा नेमबाज अनीश भानवाला देखील आहे.

अनीश गेम्‍समध्ये भाग घेणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू आहे. अनीसने आंतरराष्ट्रीय नेमबाज महासंघ आयएसएसएफ ज्यूनिअर वर्ल्डकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं.

Image result for anish bhanwala zee

भारताकडून ४ नेमबाज या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. यामध्ये अनीश देखील आहे. पण अनिस हा सोबत गणिताचं पुस्तक घेऊन गेला आहे. कारण सीबीएसईने १० वीच्या गणिताचा पेपर लीक झाल्याने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे अनीशने सुटकेचा श्वास घेतला आहे.

आजपासून या खेळांना सुरुवात होत आहे. आज ओपनिंग सेरेमनी होणार आहे. ज्यामध्ये पी.व्ही सिंधू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ५ एप्रिलपासून मुख्य खेळांना सुरुवात होणार आहे.