PIC : मुंबईत असतानाही सामना पाहू शकली नाही अनुष्का, विराट सेनेला केले असे चीअर

टी-२० स्पर्धेच्या ११व्या हंगामात मंगळवारी मुंबईला विजयाची चव पहिल्यांदा चाखता आली. 

Updated: Apr 19, 2018, 08:05 AM IST
PIC : मुंबईत असतानाही सामना पाहू शकली नाही अनुष्का, विराट सेनेला केले असे चीअर

मुंबई : टी-२० स्पर्धेच्या ११व्या हंगामात मंगळवारी मुंबईला विजयाची चव पहिल्यांदा चाखता आली. सलग तीन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर चौथ्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला. चौथ्या सामन्यात मुंबईने विराटच्या बंगळूरुला हरवले. मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो रोहित शर्मा(९४), एविन लुईस (६५) आणि क्रुणाल पांड्याने. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २१३ धावा केल्या. 

बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. त्याने ६२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीनंतरही त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला.  विराटच्या या खेळीसोबत तो या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटर बनलाय. 

विराटने सुरेश रैनाला मागे टाकत आतापर्यंत ४६१९ धावा केल्यात. रैनाच्या खात्यात ४५५८ धावा आहेत. याशिवाय या हंगामात सर्वाधिक धावा विराटच्या नावावर असल्याने त्याला ऑरेंज कॅप देण्यात आलीये.दरम्यान, शेवटपर्यंत प्रयत्न करुनही विजय हाती न आल्याने विराट निराश झाला. हा सामना मुंबईत झाला. विराटची पत्नी अनुष्का शर्माही सध्या मुंबईत आहे. मुंबईत ती झिरो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुंबईत असतानाही ती या सामन्याला येऊ शकली नाही. मात्र असे असतानाही अनुष्काने विराट आणि सेनेला चीअर अप केले. 

अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली  आणि सांगितले की कामामुळे ती स्टेडियममध्ये जाऊ शकत नसल्याने व्हॅनिटी व्हॅनमध्ये सामना बघेल. ही स्टोरी शेअर करताना अनुष्काने म्हटलेय, गो आरसीबी गो, कम ऑन ब्यॉय! कामामुळे व्हॅनिटी व्हॅनमध्ये सामना पहावा लागतोय.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close