नेटमध्ये अर्जुन तेंडुलकरची विराटला बॉलिंग

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या(गुरुवार)पासून सुरुवात होणार आहे.

Updated: Aug 8, 2018, 07:19 PM IST
नेटमध्ये अर्जुन तेंडुलकरची विराटला बॉलिंग title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या(गुरुवार)पासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. दुसऱ्या टेस्टआधी भारतीय टीमनं जोरदार सराव केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं भारतीय बॅट्समनना नेटमध्ये बॉलिंग केली. भारतीय टीमला सराव द्यायची अर्जुनची पहिली वेळ नाही. इंग्लंड दौरा सुरु व्हायच्या आधीही अर्जुननं भारतीय टीमसोबत सराव केला होता. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा डावखुरा बॉलर सॅम कुरन यानं भारतीय टीमसमोर अडचणी उभ्या केल्या होत्या. अर्जुन तेंडुलकरही डावखुरा बॉलर असल्यामुळे त्याच्याकडून भारतीय टीमनं सराव केल्याचं बोललं जातंय.

अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं. या टेस्ट सीरिजमध्ये अर्जुननं ३ विकेट घेतल्या तर १४ रन केल्या आणि २ कॅच पकडले. टेस्ट सीरिजनंतर झालेल्या वनडे सीरिजमध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालेली नव्हती. त्यामुळे टेस्ट सीरिजनंतर अर्जुन इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.