एक चूक आणि अश्विनचा झाला पोपट!

ट्विटरवर केलेली एक चूक भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला चांगलीच महागात पडली आहे.

Updated: Sep 14, 2017, 09:53 PM IST
एक चूक आणि अश्विनचा झाला पोपट!

मुंबई : ट्विटरवर केलेली एक चूक भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला चांगलीच महागात पडली आहे. रेडमी नोट 4 या फोनचं प्रमोशन करण्यासाठीचं ट्विट अश्विननं केलं. अश्विननं हे ट्विट आयफोनवरून केलं. या एका चुकीमुळे अश्विनला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. अश्विन सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे आणि तीन टी-20ची सीरिज अश्विन खेळू शकणार नाही.

पाहा काय ट्विट केलं होतं अश्विननं