भारतीय बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण, 162 रनवर ऑल आऊट

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं.

Updated: Sep 19, 2018, 08:17 PM IST
भारतीय बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण, 162 रनवर ऑल आऊट  title=

दुबई : भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानचा 162 रनवर ऑल आऊट झाला. पाकिस्तानच्या पहिल्या 2 विकेट 3 रनवरच गेल्या. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिकनं पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय बॉलरनी पाकिस्तानला वारंवार धक्के दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येती 3-3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्पिनर कुलदीप यादवनं 1 विकेट घेतली.

पाकिस्तानच्या बाबर आझमनं सर्वाधिक 47 रन केले. तर शोएब मलिक 43 रन करून रन आऊट झाला. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचे 12 सामने झाले आहेत. यापैकी 6 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक मॅच पावसामुळे झाली नाही.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा