आशियाई स्पर्धा २०१८: अरपिंदर सिंगची गोल्डन जंप, भारताला १०वं सुवर्ण पदक

आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला १०वं सुवर्ण पदक मिळालं आहे.

Updated: Aug 29, 2018, 07:41 PM IST
आशियाई स्पर्धा २०१८: अरपिंदर सिंगची गोल्डन जंप, भारताला १०वं सुवर्ण पदक  title=

जकार्ता : आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला १०वं सुवर्ण पदक मिळालं आहे. ट्रिपल जंपमध्ये भारताच्या अरपिंदर सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं. अरपिंदरनं १६.७७ मीटरची उडी मारली. अरपिंदरनं फायनलमध्ये चांगली सुरुवात केली नाही. अरपिंदरचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये अरपिंदरनं १६.५८ मीटरची उडी मारली. आणि मग तिसऱ्या प्रयत्नांमध्ये अरपिंदरनं १६.७७ मीटर उंच उडी मारली. या उडीमुळे अरपिंदरचं सुवर्ण पदक जिंकणं जवळपास निश्चित झालं. पुढच्या प्रयत्नामध्ये अरपिंदरनं १६.०८ मीटरची उडी मारली.

उजबेकिस्तानच्या रुसलानला रौप्य पदक

उजबेकिस्तानच्या रुसलान कुरबानोवनं १६.६२ मीटर लांब उडी मारून रौप्य पदक पटकावलं. चीनच्या शुओ काओनं १६.५६ मीटरची उडी मारल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.