आशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य

भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. 

Updated: Aug 28, 2018, 07:44 PM IST
आशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य

जकार्ता : भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर भारताच्याच जिनसन जॉनसनला याच स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालं आहे. आशियाई स्पर्धा २०१८ मधलं हे भारताचं ९वं सुवर्ण पदक आहे. मनजीतनं १ मिनीट ४६.१५ सेकंदांमध्ये तर जॉनसननं १ मिनीट ४६.३५ सेकंदांमध्ये ८०० मीटरची शर्यत पूर्ण केली.

१९६२नंतर पहिल्यांदाच भारतानं एथलेटिक्सच्या या स्पर्धेमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं आहे. कांस्य पदक कतारच्या अब्दुला अबू बकरला मिळालं. अब्दुल्लानं १ मिनीट ४६.३८ सेकंदामध्ये ही शर्यत पूर्ण केली. २०० मीटरपर्यंत मनजीत पाचव्या क्रमांकावर होता पण यानंतर त्यानं वेग वाढवला आणि अब्दुलाला पिछाडीवर टाकून सुवर्ण पदक पटकावलं.

आशियाई स्पर्धा २०१८मध्ये भारतानं आत्तापर्यंत ९ सुवर्ण पदकं, १८ रौप्य पदकं आणि २२ कांस्य पदकं पटकावली आहेत. यामुळे भारताची पदकांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. एथलेटिक्समध्ये भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक आहे. आत्तापर्यंत तेजंदरपाल सिंगनं शॉटपुटमध्ये आणि नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close