बक्षिस म्हणून कमी रक्कम दिल्याने सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला सुनावले

 बक्षिस म्हणून मिळालेली 500-500 डॉलरची रक्कम धोनी-चहल यांनी दान केली.

Updated: Jan 19, 2019, 08:19 PM IST
बक्षिस म्हणून कमी रक्कम दिल्याने सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला सुनावले title=

मेलबर्न :  भारतीय संघाने काल (18 जानेवारी) मेलबर्नच्या मैदानात  ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव केला. भारताच्या या विजया सोबतच भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने  पहिल्यांदाच द्विसंघ मालिका जिंकली. या विजयामुळे भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसऱ्या ठिकाणी मात्र भारतीय खेळाडूंना मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेवरुन भारताच्या माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल (18 जानेवारी) मेलबर्नला झालेल्या सामन्यात यजुवेंद्र चहालने सहा विकेट घेतल्या तर धोनीने 87 धावांची नाबाद खेळी केली. मेलबर्नच्या विजयात यजुवेंद्र चहाल आणि महेंद्रसिंह धोनीच्या खेळीचे मह्त्वपूर्ण योगदान होते. या खेळीसाठी यजुवेंद्र चहलला सामनावीर तर धोनीला मालिकावीरचा किताब देण्यात आला. यावेळी या दोघांना धोनी-चहलला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून 500-500 डॉलरचे (35 हजार) बक्षिस देण्यात आले. धोनी-चहल या दोघांना मिळालेली 35 हजारांची रक्कम  दान केली. 

भारताला विजयी चषक ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम ग्रिलख्रिस्टच्या हस्ते देण्यात आले. पण यावेळी कोणत्याच प्रकारचे रोख रक्कमेचे बक्षिस संघाला देण्यात आले नाही. तसेच धोनी-चहलला बक्षिस म्हणून फार कमी रक्कम दिल्याने सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला सुनावले. 'या तीन सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी मोठी रकम ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला प्रायोजकांकडून मिळते'. असे गावस्कर म्हणाले. ज्या खेळाडूंच्या जीवावर पैसै कमावता, त्या खेळाडूंना त्यातील काही हिस्सा खेळाडूंना देऊ केला तर काय बिघडेल? असा प्रश्न गावसकर यांनी उपस्थित केला.

ज्या खेळाडूंच्या जीवावर तुम्ही कोटींचे प्रायोजक्त्व मिळवता, त्या खेळाडूंना बक्षिस देण्यासाठी तुमच्याकडे रक्कम नाही का, या शब्दात गावस्कर यांनी समाचार घेतला. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात द्विसंघ मालिका जिंकली.  या सामन्याच्या विजयासोबत हा मालिका विजय मह्त्वाचा आहे. त्यामुळे हा मालिका विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. यानंतर देखील ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने कोणत्याही प्रकारचे बक्षिस जाहीर केले नाही.