'या' पत्रकाराने केली सचिनची चेष्टा!

सचिन तेंडुलकर आणि त्याचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 03:46 PM IST
'या' पत्रकाराने केली सचिनची चेष्टा!

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि त्याचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. सचिनचे चाहते इतके पक्के आणि निष्ठावान आहे की सचिनविरोधात ते काहीच ऐकून घेत नाहीत. पुन्हा एकदा याचाच प्रत्यय येणारी एक घटना समोर आली आहे. एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने एक फोटो शेअर केला आणि त्याद्वारे टेनिस स्टार मारिया शारापोवा आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची चेष्टा केली. त्यानंतर चाहत्यांनी पत्रकाराला चांगलेच झापले. 

ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमैनने सोशल मीडियावर रुसची टेनिस स्टार मारिया शारापोवा आणि ई कॉमर्स कंपनी अली बाबाचे मालक जॅक मा चा एक फोटो शेअर केला. 
या फोटोला कॅप्शन देताना फ्रीडमैनने शारापोवाच्या वतीने लिहिले की, "माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की अखेर मी सचिन तेंडुलकरला भेटले."

खरंतर फ्रीडमैन ने सचिन आणि जॅकची तुलना का केली, यामागे देखील एक रंजक गोष्ट आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शारापोवाला, तू सचिनला ओळखतेस का? असे विचारले असता, ती म्हणाली, "नाही. मी सचिनला नाही ओळखत." त्यानंतर मात्र सोशल मीडियावर तिच्यावर खूप टीका झाली. 

या घटनेला डेनिस फ्रीडमैन या फोटोच्या माध्य्मातून शारापोवाची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून त्याने जॅक मा ला सचिन असल्याचे भासवले. मात्र या सगळ्यामुळे सचिनचे फॅन्स चांगलेच भडकले. 

त्याचबरोबर ट्विट करून मर्यादित राहण्याचा सल्ला देखील दिला. 

अशाप्रकारचे वर्तन करण्याची डेनिसची ही पहिली वेळ नसून त्यापूर्वी देखील त्याने टीम इंडियाची चेष्टा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडे सीरीजमध्ये ही चेष्टा करण्यात आली होती. तेव्हाही त्याने एक फोटो शेअर केला होता. त्यात विराट कोहली आणि टीम इंडिया झाडू मारताना दाखवण्यात आले होते.