टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास, एका सेंच्युरीत लगावले १९ फोर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम यांच्यात खेळण्यात आलेल्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 21, 2017, 06:42 PM IST
टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास, एका सेंच्युरीत लगावले १९ फोर title=
Image: ICC

नवी दिल्ली : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम यांच्यात खेळण्यात आलेल्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटची टीम मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरली तेव्हाचा नजारा पाहून ऑस्ट्रेलियाची टीम जिंकेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, तसं झालचं नाही.

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर मारण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मात्र, बेथने जबरदस्त इनिंग खेळल्यानंतरही इंग्लंडच्या महिला टीमने चार विकेट्सने मॅच जिंकली.

इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीममधील डेनिली वाइटने धडाकेबाज बॅटिंग करत सेंच्युरी लगावत टीमला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाच्या टीमने सर्वात प्रथम बॅटिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी मुनीने आपली नॉट आऊट ११७ रन्सची इनिंग खेळली. या इनिंगमध्ये १९ फोर लगावले. हा रेकॉर्ड महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड आहे.

महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मेन लैनिंग (१८ फोर) मारले होते. तर, पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक फोर लगावण्याचा रेकॉर्ड हर्शल गिब्स, आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावावर आहे. तिघांनीही १४ लगावले.

मुनीने नॉट आऊट सेंच्युरी लगावल्यामुळे पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमने २० ओव्हर्समध्ये दोन विकेट्स गमावत १७८ रन्स बनवले. त्यानंतर इंग्लंडच्या टीमने १९ ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत १८१ रन्स बनवले.