शोएब-सानियाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मलिक कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Updated: Oct 30, 2018, 11:26 AM IST
शोएब-सानियाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन title=

नवी दिल्ली : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलिक कुटुंबिय ज्याची वाट बघत होतं तो क्षण आला आहे.

 सानियाने 30 ऑक्टोबरच्या सकाळी मुलाला जन्म दिला आहे. शोएब मलिकने ट्विट करत याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. शोएब मलिकने #BabyMirzaMalik असं ट्विट करत म्हटलं की, मुलांच्या जन्माची बातमी देतांना खूप उत्साहित आहे. प्रार्थना आणि आशिर्वादासाठी धन्यवाद.

सानियाने जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताना शोएबने #BabyMirzaMalik असं हॅशटॅग वापरला जो सध्या ट्रेंड होत आहे.

भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला होता. लग्नाच्या 8 वर्षानंतर त्यांच्या घरी गोड बातमी आली आहे. या बातमीनंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.