या कारणामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही भुवनेश्नवर कुमार

यंदाचे वर्ष हे भारतीय संघासाठी यशस्वी ठरलेय. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे क्रिकेटर खुशीत आहेतच मात्र त्याबरोबर त्यांच्याकडे सेलिब्रेशनचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे भुवनेश्नवर कुमार.

Updated: Nov 10, 2017, 08:01 PM IST
या कारणामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही भुवनेश्नवर कुमार

नवी दिल्ली : यंदाचे वर्ष हे भारतीय संघासाठी यशस्वी ठरलेय. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे क्रिकेटर खुशीत आहेतच मात्र त्याबरोबर त्यांच्याकडे सेलिब्रेशनचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे भुवनेश्नवर कुमार.

प्रतिस्पर्धी खेळाडूंना आपल्या गोलंदाजीवर नाचवणाऱ्या भुवनेश्वर कुमार स्वत: क्लीन बोल्ड झालाय. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यानच २३ नोव्हेंबरला भुवनेश्नवर कुमारचे लग्न होतेय. नुपुरशी त्याचा विवाह होतो. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. 

भुवनेश्नवर आणि नुपूर यांचे लग्न गृहनगर मेरठमध्ये होणार आहे. भुवनेश्नवरने काही दिवसांपूर्वीच नुपूरसोबतचा फोटो शेअऱ केला होता. 

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भुवनेश्नवरची निवड करण्यात आलीये. मात्र पहिल्या कसोटीसह(१६ ते २० नोव्हेंबर) दुसऱ्या कसोटीतही(२४ ते २८ नोव्हेंबर) तो खेळेल की नाही याबाबत शंकाच आहे. यामागचे गोड कारण म्हणजे लग्न. 

भुवीच्या लग्नात भारतीय संघातील क्रिकेटर्सही सहभागी होती की नाही हे निश्चित नाही. कारण २४ नोव्हेंबरपासून दुसरी कसोटी सुरु होतेय. त्यामुळे २३ नोव्हेंबरला लग्नानंतर लगेच २४ नोव्हेंबरला नागपूरला सामना खेळणे कठीण आहे. 

भुवीच्या लग्नाचे शेड्यूल्ड

भुवी आणि नुपूर २३ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकतील. त्यानंतर २६ नोव्हेंबरला बुलंदशहर आणि ३० नोव्हेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्‍शन पार्टीचे आयोजन करण्यात आलेय. यावेळी टीम इंडिया, नातेवाईक आणि जवळचा मित्र परिवार सहभागी होईल. 

कोण आहे नुपूर

भुवनेश्वर कुमारची होणारी पत्नी नुपूरने नोए़़डा येथून बीटेकचे शिक्षण घेतलेय. नोएडामध्येच एका खाजगी कंपनीत ती काम करते. ४ ऑक्टोबरला या दोघांचा साखरपुडा झाला. सोशल मीडियावरुन त्याने ही गोष्ट चाहत्यांना सांगितली होती.