अन् ब्रेट ली कुस्तीच्या आखाड्यात उतरला

ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची खेळपट्टीवरील कमाल आपण कित्येक वर्ष पाहिली आहे.

Updated: Sep 13, 2017, 07:26 PM IST
अन् ब्रेट ली कुस्तीच्या आखाड्यात उतरला

मुंबई : ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची खेळपट्टीवरील कमाल आपण कित्येक वर्ष पाहिली आहे.

त्यानंतर आशा भोसलेसोबत गाताना, गिटार वाजवताना त्याला पाहिले. पण ब्रेट चे कुस्तीच्या आखाड्यातील रांगडे रूप तुम्ही पाहिले आहे का ?  

स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ब्रेट ली चक्क कुस्तीच्या आखाडात उतरला आहे. अस्सल पैलवानाप्रमाणे ब्रेट लीने  आखाड्यात प्रवेश करण्याआधी मातीला वाकून नमस्कार केला. दंड बैठका मारल्या. त्यानंतर एका पैलवानासोबत खेळताना अवघ्या ३२ सेंकदामध्ये त्याला चीतपटही केले. 

सध्या ब्रेट ली कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये २०१७ मध्ये कॉमेंट्री पॅनलचा एक भाग आहे. पण केवळ पॅनलचा भाग म्हणून नाही तर त्याने कन्नड भाषेत बोलण्याचाही प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी कन्नड भाषेतील एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअरही करण्यात आला होता. 

क्रिकेट व्यतिरिक्त भारतात ब्रेट ली अनेक सामाजिक संस्थांचा एक भाग म्हणून काम करत आहे.