नऊ महिन्यांच्या बंदीनंतर बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का

केपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (सीए) आघाडीचा बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय.

Updated: Mar 30, 2018, 11:07 AM IST
नऊ महिन्यांच्या बंदीनंतर बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का  title=

लंडन : केपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (सीए) आघाडीचा बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय.

काय म्हटलंय 'सोमरसेट'नं?

सोमरसेट या सीझनसाठी पुन्हा एकदा बॅनक्राफ्टसोबत करार करणार होती.. परंतु, आता मात्र त्यांनी या होणाऱ्या करारातून काढता पाय घेतलाय. 

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूनं सोमरसेटचा संचालक एन्डी हरे यांचा संदर्भ देत ही माहिती दिलीय. 'आम्ही क्लबचे सीईओ, कॅप्टन आणि मुख्य कोच यांच्याशी चर्चा केली आणि क्लबच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय की, बॅनक्राफ्ट २०१८ सीझनमध्ये आमचा परदेशी खेळाडू नसेल'

आम्ही याबाबतीत कॅमरूनशीही संवाद साधला तेव्हा त्यानं आपली चूक कबूल केली आणि आपण त्यावर खजिल असल्याचंही म्हटलंय... क्लबशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची त्यांनी माफी मागितलीय, असंही त्यांनी यात म्हटलंय. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

स्टीव्ह स्मिथचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असलं तरी त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आणखी एक झटका दिला आहे. दोन वर्षांपर्यंत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकणार नाही. त्यामुळे २०१९च्या वर्ल्ड कपसाठी स्मिथची टीममध्ये निवड झाली तरी त्याला कर्णधार होता येणार नाही.

तर डेव्हिड वॉर्नरला यापुढे कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता येणार नाही, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे २०१९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.