चॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने सराव सामन्यात केली ही सर्वात मोठी चूक, आता नाही संधी...

 चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 30, 2017, 04:50 PM IST
 चॅम्पियन्स ट्रॉफी :  हार्दिक पांड्याने सराव सामन्यात केली ही सर्वात मोठी चूक, आता नाही संधी... title=

लंडन :  चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते. 

एक्सपर्टनुसार पांड्याने गोलंदाजीवेळी केलेल्या चुकीमुळे त्याला गोलंदाज म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो टीममध्ये असेल पण फलंदाज म्हणून असू शकतो. पण कर्णधार विराट कोहली त्याला तेज गोलंदाज म्हणून संधी देणार नाही. हार्दिकने ज्या लेंथवर गोलंदाजी केली, ती लेंथ ब्रिटीश पिचवर यशस्वी ठरत नाही. 

पहिल्या सामन्यात पांड्याने एकूण ६ ओव्हर टाकल्या त्यात त्याने ४९ धावा दिल्या. ल्यूक रॉंकी आणि केन विल्यमसन यांनी खूप धावा काढल्या. कोहली आणि भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे याला वाटते की हार्दिक आपली लेंथमध्ये बदल केला नाही. भुवनेश्वर, शमी आणि उमेश यादव याने ज्या प्रकारे गोलंदाजी केले, तसे करण्यात हार्दिक कमी पडला.