चेन्नईने टॉस जिंकला, आधी गोलंदाजीचा निर्णय

आयपीएल 2018 चा पहिला प्लेऑफ सामना आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे.

Updated: May 22, 2018, 08:17 PM IST
चेन्नईने टॉस जिंकला, आधी गोलंदाजीचा निर्णय title=

मुंबई : आयपीएल 2018 चा पहिला प्लेऑफ सामना आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. चेन्नईचा सामना आज पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या हैदराबाद विरुद्ध होणार आहे. याआधी 2 वेळा चेन्नईचा सामना हैदराबाद सोबत झाला आहे. ज्यामध्ये चेन्नईने दोन वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा बाजू भक्कम आहे.

लीगमध्ये दोन्ही संघाकडे 18 गुण आहे. नेट रनरेट नुसार केन विलियमसनची टीम टॉपवर आहे. वानखेड़ स्टेडिअमवर सामना जिंकणारी टीम सरळ 27 मेला होणाऱ्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. याच मैदानात फायनल मॅच रंगणार आहे. कोलकातामध्ये 25 मेला दूसरी क्वालिफायर सामना होणार आहे.