सनी लिओनीच्या गाण्यावर थिरकला क्रिस गेल

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलचा डान्स सर्वांनीच पाहिला असेल. मात्र त्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. रविवारी गेलने हा व्हिडीओ शेअर केलाय.

Updated: Jul 17, 2017, 10:52 PM IST
सनी लिओनीच्या गाण्यावर थिरकला क्रिस गेल

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलचा डान्स सर्वांनीच पाहिला असेल. मात्र त्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. रविवारी गेलने हा व्हिडीओ शेअर केलाय.

या व्हिडीओमध्ये ख्रिस गेल एका गाण्यावर थिरकताना दिसतोय. ते गाणं म्हणजे अभिनेत्री सनी लिओनीचं लैला ओ लैला हे आहे. लैला ओ लैला या गाण्यावर ख्रिस गेल थिरकताना दिसतोय. 

या व्हिडिओच्या माध्यमातून गेलने आपल्या चाहत्यांना #ChrisGayleDanceChallenge देखील दिले आहे. हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला ५००० डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.