'लकी' दिवस' : होता होता राहिला गेल चा हा रेकॉर्ड

२३ एप्रिल २०१३ ला त्याने टी २० इतिहासातील सर्वात तुफानी खेळी केली होती. बंगळूरकडून खेळताना पुण्याविरुद्ध त्याने १७५ रन्सची खेळी केली होती. यामध्ये १७ सिक्स लगावले होते. 

Updated: Apr 23, 2018, 08:09 PM IST
 'लकी' दिवस' : होता होता राहिला गेल चा हा रेकॉर्ड  title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात थोड्यावेळात पंजाब आणि दिल्लीची टीम आमनेसामने येणार आहे. त्यामुळे ख्रिस गेलकडे सर्वांची नजर लागली असताना तो या मॅचमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. गेलने गेल्या ३ मॅचमध्ये २ अर्धशतक आणि शतक लगावले. पण २२ मॅचमध्ये दिल्लीविरुद्ध तो तुफानी खेळी करणार अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती. गेल आज ओपनर साथी के. एल. राहुल याचा सर्वात फास्ट अर्धशतकाचा रेकॉर्ड तोडणार या विश्वासाने चाहते सामना पाहायला आले पण गेल खेळत नसल्याचे त्यांना समजले. १४ बॉलमध्ये अर्धशतक लगावले होते. गेलचा आज लकी दिवस आहे. २३ एप्रिल २०१३ ला त्याने टी २० इतिहासातील सर्वात तुफानी खेळी केली होती. बंगळूरकडून खेळताना पुण्याविरुद्ध त्याने १७५ रन्सची खेळी केली होती. यामध्ये १७ सिक्स लगावले होते. 

सिक्सरचा बादशाह 

यावेळेस तो पंजाबकडुन खेळतोय. २ मॅचमध्ये त्याला संधी मिळाली नाही. पण तिसऱ्या मॅचमध्ये त्याने धमाका केला. त्याने आतापर्यंत सर्वाधिक २१ सिक्स लगावले आहेत. हैदराबादविरुद्ध त्याने ११ सिक्स टोलावले.