टी10 लीगमध्ये शतक ठोकणाऱ्या खेळाडूला मिळणार 'हे' खास बक्षीस!

टी२० किक्रेटनंतर यूएईमध्ये टी१० लीगला सुरूवात झाली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 15, 2017, 09:33 AM IST
टी10 लीगमध्ये शतक ठोकणाऱ्या खेळाडूला मिळणार 'हे' खास बक्षीस! title=

नवी दिल्ली : टी२० किक्रेटनंतर यूएईमध्ये टी१० लीगला सुरूवात झाली आहे.

ही आहे टूर्नामेंटची विशेषता

यात शाहिद आफ्रीदी, वीरेंद्र सहवाग, ऑयन मॉर्गन, एलेक्स हेल्स, मोहम्मद आमिर यांसारखे खेळाडू खेळणार आहेत. या टूर्नामेंटची विशेषता ही आहे की, शतक आणि अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंचे देखील नशीब चमकणार आहे. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, दुबईत ५ लाख दिराम म्हणजेच ८५ लाखांचे  घर  मिळेल. तर अर्धशतक लगावणाऱ्या खेळाडूंना ह्यूबलॉटचे घड्याळ मिळेल. याची किंमत ५ लाखापासून सुरू होते.

कोणी दिली माहीती ?

मराठा अरेबियंस टीमचे मालिक अली तुंबींच्या वतीने खलीज टाइम्सने सांगितले की, जे कोणी फलंदाज शतक ठोकवेल त्याला ५ लाख दिरामचे घर मिळेल. बाकी कोणत्या टीमबद्दल मला ठाऊक नाही. पण माझ्या टीममध्ये एलेक्स हेल्स, वीरेंद्र सहवाग आणि कामरान अकमल यांसारखे खेळाडू शतक लावू शकतात.

पहिली टूर्नामेंट 

हा टी१० चा नवा फॉर्मेट असून याची पहिली टूर्नामेंट फक्त ४ दिवस चालेल. १०-१० ओव्हरच्या या लीगमध्ये एकूण ६ टीम सहभागी होतील. याची एक मॅच ९० मिनीटांची असेल.
गुरूवारी या लीगची पहिली मॅच खेळली जाणार असून ही मॅच बंगाल टाइगर्स आणि केरल किंग्समध्ये होईल. तर दूसरी मॅच मराठा अरेबियंस आणि पख्तून या टीममध्ये असेल.