३ वर्षापूर्वी 'तिने' केलं होतं विराटला प्रपोज, आता दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधानात अडकले आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 12, 2017, 02:11 PM IST
३ वर्षापूर्वी 'तिने' केलं होतं विराटला प्रपोज, आता दिल्या लग्नाच्या शुभेच्छा title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधानात अडकले आहेत.

विराटला केलेलं प्रपोज

विराटच्या विवाहानंतर अनेक तरुणींचा हिरमोड झाला. विराटच्या जगभरात अनेक चाहत्या आहेत. यामध्ये एका महिला क्रिकेटरचा देखील समावेश आहे. जिने विराटला प्रपोज देखील केलं होतं.

लग्नाचा ठेवला होता प्रस्ताव

इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वेट देखील कोहलीची चाहती होती. ३ वर्षापूर्वी तिने विराटला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

सोमवारी विराट कोहलीने अनुष्का शर्मा सोबत विवाहाची घोषणा केली. यानंतर अनेकांनी त्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये डेनियल वेट सुद्धा होती. डेनियल वेटने विराटला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Image result for Danielle Wyatt and virat zee

वेटने ट्विटरवर ट्विट करत विराटला शुभेच्छा दिल्या. कोहलीने सोमवारी इटलीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत सात फेरे घेतले. या विवाह सोहळ्याला काही जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. पण नातेवाईकांसाठी २१ डिसेंबरला दिल्लीत तर क्रिकेटर्स आणि सिनेकलाकारांसाठी २६ डिसेंबरला मुंबईत रिसेपशन ठेवण्यात आलं आहे.