डेन्मार्क ओपन : सायना दुसऱ्या फेरीत तर पी व्ही सिंधूला पराभवाचा धक्का

भारताची बॅडमिंटन पट्टू पी व्ही सिंधूला डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. चीनच्या दहाव्या मानांकित चेन यूफेई हिने सिंधूचा २१-१७, २३-२१ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. तर सायना नेहवालने कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2017, 02:38 PM IST
डेन्मार्क ओपन : सायना दुसऱ्या फेरीत तर पी व्ही सिंधूला पराभवाचा धक्का title=

ओडेन्स : भारताची बॅडमिंटन पट्टू पी व्ही सिंधूला डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. चीनच्या दहाव्या मानांकित चेन यूफेई हिने सिंधूचा २१-१७, २३-२१ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. तर सायना नेहवालने कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाला पत्करावा लागल्याने क्रीडा प्रेमी नाराज झालेत.  सिंधूला चायनाच्या चेन युफेईने २१-१७, २३-२१ असं हरवलं. ४३ मिनिटे हा सामना रंगाला. याआधी जपान ओपनमध्येही सिंधूचं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

दोन्ही सेटमध्ये सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने जोरदार सुरूवात केली आणि ३-० अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर सामन्यात चायनाच्या चेनने कमबॅक केला आणि ९-९ अशी बरोबरी झाली.  दोघींचे १७-१७ गुण होईपर्यंत लढत रंगली. चायनाच्या चेनने एकमागे एक ४ गुण घेत पहिला सेट आपल्या नावे केला आणि पहिल्या सेटमध्ये झालेल्या पराभवाचे दडपण सिंधूवर आले. 

नंतर सिंधूने ४ गुण मिळवच सामन्यात कमबॅक केले. पण चेनने पुन्हा एकदा सिंधूच्या नेटवरील खराब परफॉर्मन्सचा फायदा उचलला आणि १५-११ ची आघाडी घेतली. दुसरा सामना २०-२० पर्यंत बरोबरीत होता. नंतर चेनने चांगली  २३-२१ने दुसरा सेटही आपल्या नावे केला. 

सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत 

भारताची फुलराणी सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिलाय. सायनाने मरीनवर सरळ दोन सेट्समध्ये २२-२०, २१-१८ अशी मात केलेय. त्यामुळे तिच्याकडून पदकाच्या आशा आहेत.