झिवाला चिअरअप करण्यासाठी धोनीची तिच्या शाळेत हजेरी....

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची जादू अजूनही कमी झालेली नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 13, 2018, 12:56 PM IST
झिवाला चिअरअप करण्यासाठी धोनीची तिच्या शाळेत हजेरी....

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची जादू अजूनही कमी झालेली नाही. धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी कॅप्टन कूलचे चाहते त्याला फॉलो करतात. विश्रांती घेत असलेला धोनी सध्या आपल्या परिवाराला पूर्ण वेळ देत आहे. 

झिवाला चिअरअप करायला पोहचला धोनी

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी एकदिवसीय सिरीजमध्ये धोनी खेळणार आहे. भारत दक्षिण आफ्रिकेत ६ वनडे आणि ३ टी२० मॅच खेळणार आहे. भारतीय क्रिकेट टीम टेस्ट सिरीजसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे मात्र धोनीने टेस्ट मॅचमधून संन्यास घेतल्याने तो आराम करत आहे. अशाच वेळी तो आपली मुलगी झिवाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलानासाठी गेला होता. तेव्हाच फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत झिवा परिच्या वेशभूषेत दिसत आहे.

धोनी आकर्षणाचे केंद्र झाला

याव्यतिरिक्त एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात धोनी झिवाच्या क्लासमेट्सशी बोलत आहे. झिवाच्या वार्षिक स्नेहसंमेलानात धोनी आकर्षणाचे केंद्र झाला होता. हे सगळे पाहता धोनीने टेस्ट क्रिकेटमधून घेतलेला संन्सास, भारतीय टीम आणि टी20 चे सोडलेले कर्णधारपद याचा धोनीच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झाला नाही. 

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close