विमानात चेहरा झाकून का बसला होता हा क्रिकेटर

अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे जगभरात फॅन असतात. मग तो क्रिकेटपटू असो किंवा अभिनेता किंवा आणखी कोणतं प्रोफेशन असो. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे फॅन असतात.

Updated: Nov 14, 2017, 03:18 PM IST
विमानात चेहरा झाकून का बसला होता हा क्रिकेटर

मुंबई : अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे जगभरात फॅन असतात. मग तो क्रिकेटपटू असो किंवा अभिनेता किंवा आणखी कोणतं प्रोफेशन असो. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे फॅन असतात.

जेव्हा अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी येतात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी होते. अशा वेळेस अशा व्यक्तींना थोडाफार त्रास देखील सहन करावा लागतो.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे देखील लाखो चाहते आहेत. त्याच्यासाठी सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रवास करणे सोपे नाही. धोनीने फॅन्सच्या नजरेतून वाचण्यासाठी नवीन उपाय शोधून काढला आहे.

धोनीची पत्नी साक्षीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सोमवारी काही व्हिडिओ शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये, धोनी फ्लाइटमध्ये बसला आहे, पण त्याने आपला चेहरा झाकला आहे. लोक तिथून जातांना धोनीला नोटीस देखील करत आहेत.

 

#traveldiaries

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

याशिवाय, धोनी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शांतपणे उभा आहे आणि साक्षीदार त्याच्याबरोबर मस्करी करत आहेत.

 

#traveldiaries

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

धोनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि म्हणूनच तो कोलकाता कसोटीत खेळू शकणार नाही. म्हणूनच त्याला कुटुंबीयांना वेळ देण्याची संधी मिळाली आहे.