धोनी म्हणतो, त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!

पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.

Updated: Apr 16, 2018, 04:50 PM IST
धोनी म्हणतो, त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!

मोहाली : पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या. यातल्या ४७ रन तर धोनीनं शेवटच्या ४ ओव्हरमध्ये फटकावल्या. १९८ रनचा पाठलाग करत असताना धोनीला चेन्नईला १९३ रनपर्यंतच पोहोचवता आलं, त्यामुळे चेन्नईचा ४ रननी पराभव झाला. चेन्नईचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी धोनीनं मात्र सगळ्यांचं मन जिंकलं.

पाठीच दुखणं असूनही खेळला धोनी

मैदानात असताना धोनीला पाठीचा प्रचंड त्रास होत होता. फलंदाजी करताना याचा त्याला भरपूर त्रास झाला. मात्र मैदानावर अगदी खंबीरपणे तो उभा होता. धोनीने ४४ बॉलमध्ये आपल्या खेळात ६ सिक्स आणि ५ फोर मारले. शेवटच्या ५ ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७६ रनची गरज होती आणि ते असंभव वाटत होते. १८ आणि १९ व्या ओव्हरमध्ये १९-१९ रन्स करून शेवटच्या ६ चेंडूत १७ रनची गरज होती. पण चेन्नईला १२ रन्स करता आल्या.

धोनीनं एका हातानंच मारली सिक्स

पाठदुखी असतानाही धोनीनं एका हातानं सिक्स मारली. धोनीच्या या सिक्सचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. दुखापतीमुळे पाठीची स्थिती खूप वाईट होती पण देवानं मला ताकद दिली. शॉट खेळताना मला पाठीचा जास्त वापर करण्याची गरज पडली नाही. यासाठी माझे हातच पुरेसा आहे, अशी प्रतिक्रिया धोनीनं मॅचनंतर दिली. पाठीची दुखापत फारशी गंभीर नाही. नेमकं काय झालं आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मी लवकर फिट होईन, असा विश्वास धोनीनं व्यक्त केला आहे.