१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.

Updated: May 30, 2017, 08:08 PM IST
१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...  title=
सौजन्य : हॉटस्टार

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे. या मॅचमध्ये धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या मॅचदरम्यान धोनी डगआऊटमध्ये बसलेला पाहायला मिळाला. गेल्या १३ वर्षांमध्ये राखीव खेळाडूंची जर्सी घालून ड्रेसिंग रूममध्ये बसण्याची धोनीची ही पहिलीच वेळ आहे. २००४मध्ये बांग्लादेशविरुद्धच्याच मॅचमध्ये धोनी त्याची पहिली वनडे खेळला होता.

दरम्यान या मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशला विजयासाठी ३२५ रन्सचं आव्हान दिलं आहे. भारताकडून दिनेश कार्तिकनं ९४, हार्दिक पांड्यानं नाबाद ८० आणि शिखर धवननं ६० रन्स केल्या.