VIDEO: दिनेश कार्तिकने खेळलेल्या त्या ८ चेंडूचा पूर्ण हिशोब...

निदहास ट्रॉफीमध्ये विजयाचा सूत्रधार ठरला तो दिनेश कार्तिक. त्याने अशक्य ते शक्य करुन दाखवत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ८ चेंडूत जो कारनामा केला त्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. कार्तिने ८ चेंडूत २९ धावा कुटल्या. यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. 

Updated: Mar 19, 2018, 12:25 PM IST
VIDEO: दिनेश कार्तिकने खेळलेल्या त्या ८ चेंडूचा पूर्ण हिशोब... title=

कोलंबो : निदहास ट्रॉफीमध्ये विजयाचा सूत्रधार ठरला तो दिनेश कार्तिक. त्याने अशक्य ते शक्य करुन दाखवत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ८ चेंडूत जो कारनामा केला त्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. कार्तिने ८ चेंडूत २९ धावा कुटल्या. यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. 

मनीष पांडे बाद झाल्यानंतर कार्तिक १९व्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी क्रीझवर आला. त्यावेळी टीम इंडियावा १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या.

अखेरच्या दोन ओव्हर

१८.१ - कार्तिकने रुबेलच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. आता ११ चेंडूत २८ धावांची गरज

१८.२ - रुबेलच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकला. आता संघाला १० चेंडूत २४ धावांची गरज

१८.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पुन्हा षटकार ठोकला. जिंकण्याच्या आशा वाढू लागल्या. टीम इंडियाला आता ९ चेंडूत १८ धावांची गरज होती.
१८.४ - रुबेलने चौथ्या चेंडूवर कार्तिकला बीट केले. टीम इंडियाला ८ चेंडूत १८ धावांची गरज. 
१८.५ - १९व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर कार्तिकने दोन धावा काढल्या. आता संघाला ७ चेंडूवर १६ धावांची गरज.
१८.६ - रुबेलच्या अखेरच्या चेंडूवर कार्तिकने फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकला. आता टीम इंडियाला विजयासाठी हव्यात १२ धावांची आवश्यकता. 

 

१९वी ओव्हर

१९.१ - बांगलादेशकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सौम्या सरकार आला. बॅटिंगसाठी विजय शंकरकडे स्ट्राईक होता. सौम्याने पहिला बॉल वाईड टाकसला. भारताला ६ चेंडूत ११ धावांची गरज.

१९.२ - अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कार्तिक स्ट्राईकवर आला. आता भारताला ४ चेंडूत १० धावा हव्यात.

१९.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने केवळ एख धाव घेतली. स्ट्राईक पुन्हा विजय शंकरकडे. भारताला जिंकण्यासाठी ३ चेंडूत ९ धावा. 

१९.४ - चौथ्या चेंडूवर विजय शंकरने चौकार लगावला. आता संघाला विजयासाठी २ चेंडूत ५ धावांची गरज. मैदानात शांतता कारण कोणताही संघ यावेळी जिंकू शकत होता.

१९.५ - पाचवा चेंडू शंकर खेळला. त्याने हवेत शॉट भिरकावला आणि मेहंदा हसनच्या हातात कॅच दिला. आता शेवटचा एक चेंडू आणि धावा हव्यात ५.

१९.६ - शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर दिनेश कार्तिक. जिंकण्यासाठी षटकार हवा. मॅच ड्रॉ करण्यासाठी चौकार. सौम्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक्स्ट्रा कव्हरवरुन षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराने जावेद मियांदादची आठवण दिली.