धमाकेदार ! या खेळाडूने घेतल्या ६ बॉल्समध्ये ६ विकेट्स

By Amit Ingole | Last Updated: Friday, August 11, 2017 - 23:39
धमाकेदार ! या खेळाडूने घेतल्या ६ बॉल्समध्ये ६ विकेट्स

लंडन : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे रेकॉर्ड्स बनतात, जे पाहून किंवा ऎकून अनेकांच्या भुवया उंचावतात. शुक्रवारी असंच काही इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ज्यूनिअर स्तरावरच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळालं. 

इथे अंडर-१३ क्रिकेट स्पर्धेमध्ये १३ वर्षाच्या ल्यूक रॉबिन्सनने आपल्या एका ओव्हरमध्ये ६ सहा विकेट घेऊन सर्वांनाच अंचबित केले. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ल्यूकने सहाच्या सहा विकेट बोल्ड करून घेतल्या आहेत. 

ल्यूकने या सहा विकेट घेऊन आपल्या टीमच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला आहे. ल्यूक हा उत्तर-पूर्व इंग्लंडच्या हफ्टन-ले-स्प्रींगमध्ये फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबसाठी खेळत आहे. ल्यूकसाठी या खेळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे. त्याचं कुटुंब या शानदार प्रदर्शनादरम्यान, या मॅचसोबत जुळलेलं होतं. जेव्हा ल्यूक खेळत होता आणि विकेट घेत होता तेव्हा त्याचे वडील स्टीफन रॉबिन्सन बॉलिंग एन्डवर अम्पायरिंग करत होते. तर त्याची आई हेलेने पॅव्हेलियनमध्ये बसून स्कोरबुकमध्ये या मॅचचे स्कोरिंग रेकॉर्ड करत होती. 

इतकेच नाहीतर त्याचा लहान भाऊ मॅथ्यू त्याच्याच टीमचा भाग आहे आणि तो फिल्डींग करत होता. त्याचे आजोबा ग्लेन हे सुद्धा बॉन्ड्रीवर उभे राहून आपल्या नातवाचा हा यादगार क्षण बघत होते. ल्यूकच्या या कामगिरीवर त्याचे वडील म्हणाले की, ‘ते गेल्या ३० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत. त्यांनी सुद्धा हॅट्रीक घेतली होती. मात्र ल्यूकसारखा रेकॉर्ड मी कधीही पाहिला नव्हता. सिनीअर टीममध्ये खेळत असलेल्या ल्यूकच्या वडीलांनी सांगितले की, आज वाटतंय की क्रिकेटमध्ये असंही होऊ शकतं.

(Image Credit: www.sunderlandecho.com

First Published: Friday, August 11, 2017 - 23:38
comments powered by Disqus