फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप : भारताचे आव्हान संपुष्टात

फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं आव्हान संपुष्टात आलं. अखेरच्या लीग मॅचमध्ये भारताला घानाकडून 4-0 नं पराभव स्वीकारावा लागला. 

Updated: Oct 12, 2017, 10:39 PM IST
फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप : भारताचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं आव्हान संपुष्टात आलं. अखेरच्या लीग मॅचमध्ये भारताला घानाकडून 4-0 नं पराभव स्वीकारावा लागला. 

या मॅचमध्ये भारताची कामगिरी अपेक्षित झाली नाही. आणि अमरजित सिंगच्या टीमला या मॅचमध्ये एकही गोल झळकावता आला नाही. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताला लीग मॅचेसमध्ये गाशा गुंडाळावा लागला असला तरी आपल्या खेळानं भारतीय फुटबॉलपटूंनी सा-यांचीच मनं जिंकली. 

पहिला-वहिला वर्ल्ड कप खेळणा-या या टीमनं सा-यांचच लक्ष वेधून घेतलं. या टुर्नामेंटमध्ये भारताला केवळ एकच गोळ झळकावता आला.