प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटूविरोधात गुन्हा

कबड्डीच्या खेळा दरम्यान प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे याने प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Nov 13, 2017, 09:46 PM IST
प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटूविरोधात गुन्हा title=

मुंबई : कबड्डीच्या खेळा दरम्यान प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे याने प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या ज्युनियर निवड चाचणीच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळ पराभूत झाल्यावर या संघाचे प्रशिक्षक आणि प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे यांनी विजयी संघाला चिअर करणाऱ्या प्रेक्षकाला मारहाण केली. 

सतीश सावंत असं प्रेक्षकाचं नाव आहे. तो भांडुपचा रहिवासी आहे. उपनगर जिल्हा असोसिएशनचे सहसचिव तसंच स्वस्तिकत क्रीडा मंडळाचे सहप्रशिक्षक प्रताप शेट्टी यांनीही प्रेक्षकाला मारहाण केल्याचं प्रेक्षकाचं म्हणणं आहे. प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदेने यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय.