भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा...

 भारताने लंडनमध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लिगच्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा ७-१ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 18, 2017, 08:44 PM IST
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा...

लंडन :  भारताने लंडनमध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लिगच्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा ७-१ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. 

डिफेंडर हरमनप्रित सिंग, स्टाइकर तलविंदर सिंग आणि आकाश दिप सिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर पाकिस्तानचा धुवा उडविण्यात भारताला यश मिळाले. 

हा  भारताचा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी कॅनडा आणि स्कॉटलंडला पराभूत केले आहे. 

भारताने सुरूवातच आक्रमक केली.  १३ व्या मिनिटालाच पहिला गोल पेनल्टी कॉनरद्वारे हरमनप्रीतने केला... तर तलविंदर सिंग याने दुसऱ्या हाफमध्ये २१ व्या आणि २४ व्या मिनिटाला पाकिस्तानावर गोल केले. 

त्यानंतर ४७ आणि ४९ व्या मिनिटाला आकाशदीप आणि प्रदीप मोर यांनी गोल केले. 

पाकिस्तानकडून एकमेव गोल ५७ व्या मिनिटाला मोहम्मद उमर भुट्टा याने केला. 

अखेर ५९ मिनिटाला भारताच्या आकाशदीपने सातवा गोल करून भारताला सहा गोलची आघाडीने विजय मिळवून दिला.