तुफानी खेळीनंतर गेलने कोहलीवर काढला असा राग?

गेलने कोहलीला दिलं असं उत्तर

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 09:59 AM IST
तुफानी खेळीनंतर गेलने कोहलीवर काढला असा राग?

मोहाली : मोहालीच्या आयएस बिंद्रा स्‍टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गेलला खेळण्याची संधी मिळाली. 2 सामन्यानंतर टीममध्ये त्याला जागा मिळाली. पण त्याने निराश नाही केलं. 22 बॉल मध्येच त्याने अर्धशतक पूर्ण केलं. 2017 मध्ये तो बंगळुरु मधून खेळत होता. यंदा मात्र 2 कोटी देऊन पंजाबने त्याला आपल्या संघात घेतलं. बंगळुरूने त्याला रिटेन नाही केलं. त्याच्या या तुफानी खेळीमुळे पंजाबने चेन्नई समोर 198 रनचं लक्ष्य ठेवलं.

काय बोलला गेल

मॅन ऑफ द मॅच ठरल्यानंतर गेलने वेगळ्या अंदाजात आपला राग काढला. त्याने म्हटलं की, "मला आता 25 वर्षांचा असल्यासारखं वाटतंय. जगाचा बॉस परत आला आहे. हा ख्रिस गेल आहे जो फक्त सिक्स, फोर मारतो. 1 आणि 2 रनचा विचार नाही करत. के एल राहुलने खूप चांगले शॉट खेळले आणि माझा वरचा दबाव कमी केला.'

काय बोलला होता विराट

गेलला बंगळुरू टीमने का नाही घेतलं यावर बोलताना कोहली बोला होता की एका खेळाडूवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. आम्हाला पुढच्या 3,4 वर्षांसाठीची टीम बनवायची आहे.