कुणी उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली

भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या टीममधून बाहेर आहे.  श्रीलंकेच्या विरोधातील सामने १६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे.

Updated: Nov 14, 2017, 03:04 PM IST
कुणी उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली

नवी मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या टीममधून बाहेर आहे.  श्रीलंकेच्या विरोधातील सामने १६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे.

३ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये हार्दिक पांड्याला सुरूवातीच्या २ सामन्यात आराम देण्यात आला आहे. संघात सहभागी करून न घेण्याचे कारण हार्दिक पांड्या सांगतो की, थोड्या फिजिकल त्रासामुळे त्यानेच बोर्डाकडून आरामाची मागणी केली होती. त्यामुळे ही वेळ तो फिटनेससाठी वापरणार आहे. याचा फायदा त्याला दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात नक्की होईल असा त्याचा विश्वास आहे. हे सगळं असताना सध्या हार्दिक पांड्याचे काही फोटो चर्चेत आहेत. 

हल्लीच हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. हार्दिकने आपल्या हटके लूकमुळे मॅक्सिम मॅगजीनच्या कव्हरवर जागा मिळवली आहे. पांड्याने या मॅगझिनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक ट्विट केलं आहे. त्याने असं म्हटलंय की, मॅक्सिम इंडियाच्या या महिन्यातील कव्हर पेजवर हार्दिक पांड्या आहे. 

या फोटोत हार्दिक पांड्याचे केस कलर केलेले आहेत. त्याचा हाच लूक अनेकांना पसंद न आल्याचे समोर आले आहे. आणि याचवरून पुन्हा एकदा लोकांनी त्याची मस्करी उडवली आहे. सोशल मीडियावर खिल्ली उडवत लोकांनी त्याला अनेक कमेंट केले आहेत. त्यासोबतच लोकांनी त्याला फुकटचे सल्ले दिले आहेत की, अशी स्टाईल करण्या ऐवजी आपल्या खेळाकडे लक्ष देण्याचे त्याने सांगितले आहे.