वेंगसरकरांच्या धोनीवरच्या आरोपांची पोलखोल

निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.

Updated: Mar 8, 2018, 05:58 PM IST
वेंगसरकरांच्या धोनीवरच्या आरोपांची पोलखोल

मुंबई : निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.

अशी झाली विराटची निवड

विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री पटली. म्हणून श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात विराटची निवड करण्याचे आम्ही ठरवले. त्याचा तिथे कस पाहता येईल, अशी अपेक्षा होती. संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होते. तेव्हा बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते. ते तामिळनाडूचे अध्यक्षही होते.

बद्रीला बाहेर बसावे लागत होते...

मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले. पण ते तडकाफडकी के. श्रीकांतला घेऊन तत्कालिन बोर्ड अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. श्रीकांत हा त्यानंतर निवड समिती अध्यक्ष झाला होता.

वेंगसरकरांच्या आरोपात किती तथ्य?

विराट कोहलीला संघात घेण्याच्या विरोधात धोनी, कर्स्टन आणि एन. श्रीनिवासन होते असा सूर वेंगसरकरांनी आळवला आहे. २००८ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजबाबत वेंगसरकर बोलत आहेत. पण या सीरिजच्या पाचही मॅचमध्ये कोहलीला संधी देण्यात आली होती. एवढच नाही तर या कर्स्टन आणि धोनीनं विराटला ओपनिंगला बॅटिंग करायचीही संधी दिली होती. एवढच नाही तर या ५ मॅचपैकी तिसऱ्या आणि चौथ्या या दोन्ही मॅचमध्ये बद्रिनाथ टीममधून खेळला होता. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close